Godavari River Nanded : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळं जनजीवन विस्कळी तझालं आहे. अशीच परिस्थिती नांदेड जिल्ह्यात देखील झाली आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गोदावरी नदीचे पाणी नांदेड शहरातील नागरिकांच्या घरात शिरण्यास सुरुवात झाली आहे. वसरणी भागातील पंचवटी नगरात गोदावरी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. 

Continues below advertisement

अनेक कुटुंबांना बोटीद्वारे केलं रेस्क्यू 

नांदेड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक कुटुंबांना बोटीद्वारे रेस्क्यू केले आहे. विष्णुपुरी धरणाचे 13 दरवाजे उघडण्यात आल्याने पूर परिस्थिती कायम आहे. विष्णुपुरी धरणातून तब्बल एक लाख 62 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळं नगारिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नाशिकमध्येही मुसलधार पाऊस, वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी घाट परिसरात

नाशिकच्या म्हसरुळ आरटीओ ऑफीस परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं वाघाडी नाला ओसंडून वाहत होता. पाण्याचा अंदाज न आल्यानं वाघाडी नाल्याचे पाणी थेट गोदावरी घाट परिसरात आले. नाल्याला पूर आल्यानं गोदा घाट परिसरात भरणाऱ्या आठवडे बाजारातील विक्रेत्यांचे नुकसान झाले आहे. काही विक्रेत्यांचे भाजीपाला, धान्य वाहून गेले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाघाडीचे पाणी गोदा घाट परिसरात आल्यानं अग्निशमन दल आणि मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. नाशिकमध्ये रात्री साडेआठ वाजेपर्यंत 15 मिलिमीटर पाऊस झाला, मात्र शहाराच्या इतर भागात पावसाचा शिडकाव झाला आणि पंचवटी, म्हसरूळ भागात धुवांधार पाऊस झाल्यान नागरिकांची तारम्बल तर प्रशासनाची धावपळ उडाली.

Continues below advertisement

लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस

 
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील काटेजवळ आज संध्याकाळी सातच्या सुमारास अल्पावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली. ढगफुटीसारख्या पावसामुळे गावातील सर्व रस्ते नदीसारखे झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले. गावाच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्याला अचानक पूर आला आणि ते पाणी गावात शिरल्याने नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. रस्त्यावर पाणी वेगाने वाहू लागल्याने लोकांना वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान, घरात पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातून परतणाऱ्या ग्रामस्थांना आणि जनावरांना आसरा मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. गावात अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Rains : विदर्भात पावसाचा कहर, पैनगंगा नदीला पूर, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; नाशिकच्या दिंडोरीतही जोरदार बॅटिंग, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट