जवाहरनगरमधील शेतकरी काल (शुक्रवारी)दुपारच्या सुमारास अश्टर आधार परिसरात आपल्या बकऱ्यांना(शेळ्या)चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यादरम्यान काही अज्ञात लोक तिथं आले. "शेजारच्या अपार्टमेंटमध्ये शिळ्या भाकरी आहेत, त्या तुमच्या बकऱ्यांसाठी घेऊन या, तोपर्यंत आम्ही तुमच्या बकऱ्यांकडे लक्ष देतो", असं या अज्ञातांनी पोळ यांना सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन पोळ अपार्टमेंटमध्ये गेले असता या अज्ञातांनी त्यांच्या आठ बकऱ्या लंपास केल्या. या प्रकरणी सुदार पोळ यांनी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार अज्ञात बकरी चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठवड्यात दुसरी घटना -
काही दिवसांपूर्वी बकरी चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा आठ बकऱ्या चोरीला गेल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. तर, बकरी मालकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, 31 डिसेंबर तोंडावर आहे, मटणाचे दर वाढले आहे. त्यात अशा घटना घडल्याने नागरिकही चिंतेत आहे. मटणाचे व्यापारी दर कमी करायला तयार नाहीत. तर, कोल्हापूरकरही देखील मटणदरवाढ कमी करण्यावर आडून बसले आहेत. त्यामुळे या बकरी चोरीमागे मटणाचे वाढलेले दर तर कारणीभूत नाहीत ना? असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मटण दरवाढ थेट हायकोर्टात -
मटण दरवाढीविरोधात मटणविक्रेत्यांवर दबाव टाकून दुकान बंद करण्याची नोटीस कोल्हापुरातील ग्रामपंचायतींनी घेतला होता. या निर्णयाचा मुंबई उच्च न्यायालयानं समाचार घेतला. अशाप्रकारे नोटीस बजावण्याचे कोणतेही अधिकार नसताना केलेल्या कारवाईचा खुलासा मागत गारगोटी आणि कडेगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही हायकोर्टानं नोटीस बजावली होती.
हेही वाचा - मटण दरवाढीविरोधात नोटीस बजावल्याबद्दल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाची नोटीस
Mutton Price Issue | कोल्हापुरातील मटण दरवाढीचा वाद उच्च न्यायालयात | ABP Majha