एक्स्प्लोर

Crime News: बोईसरच्या भुजिंग सेंटरमध्ये फुलली प्रेमकहाणी, मुलगी मुलासोबत पळून गेली; मालकाने मुलाच्या वडिलांच्या डोक्यात गोळी झाडली

समोर आलेल्या माहितीनुसार बोईसरच्या पूर्वेस असलेल्या महागाव परिसरामध्ये चिकन भुजंग सेंटर होतं. या चिकन भुजंग सेंटरमध्ये मुलगी कामाला होती. या ठिकाणी मुलगा सुद्धा कामाला होता.

Palghar Crime: मुलानं केलेल्या प्रेमकरणानंतर बापाला जीव गमवावा लागल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार पालघरमध्ये घडला. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या महागाव परिसरात रात्रीच्या सुमारास फायरिंग झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, ही फायरिंग प्रेमप्रकरणातून असल्याचे समोर आले. चिकन भुजिंग सेंटरमध्ये कामाला असलेली मुलगी एका मुलासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून भुजिंग सेंटरच्या मालकाने फायरिंग केली. या फायरिंगमध्ये सुरेश वरखडे यांच्या डोक्याला गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. 

नेमकं घडलं तरी काय?

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार बोईसरच्या पूर्वेस असलेल्या महागाव परिसरामध्ये चिकन भुजंग सेंटर होतं. या चिकन भुजंग सेंटरमध्ये मुलगी कामाला होती. या ठिकाणी मुलगा सुद्धा कामाला होता. मात्र, त्या मुलासोबत मुलगी पळून गेल्यानंतर चिकन भूजिंग सेंटरचा मालक चांगलाच संतापला. त्याने मुलीला पळवून नेलेल्या मुलाच्या वडिलांवर थेट फायरिंग केली. या फायरिंगमध्ये सुरेश वरखडे गंभीर जखमी झाले आहेत. अत्यंत गंभीर अवस्थेत त्यांना बोईसरमधील लाईफ लाईन्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान चिकन भूजिग सेंटरचा मालक फायरिंग करून फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता बोईसर पोलिसांकडून केला जात आहे. मात्र,  चिकन भूजिंग सेंटरमधल्या मालकाने काम करत असलेली मुलगी पळून गेली म्हणून मुलाच्या वडिलांवर फायरिंग केल्याने भूवया उंचावल्या आहेत. पोलिस तपासामध्येच आता खरं कारण समोर येणार आहे. 

फटाके फोडल्याच्या कारणावरून दोन गटात वाद

दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये शिवजयंती साजरी करताना फटाके फोडल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. बार्शीमधील बारंगुळे प्लॉटमध्ये शिवजयंती साजरी करताना फटाके उडवण्याच्या कारणावरून वाद झाला. दोन गटात झालेल्या वादावरून जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यासाठी शिवभक्त गेल्यानंतर देखील पुन्हा वाद निर्माण झाला.  जखमींना बार्शी ग्रामीण रुग्णालयात नेले असताना जमवाकडून ग्रामीण रुग्णालयाची देखील तोडफोड करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी एकूण तीन गुन्हे बार्शी पोलिसांत दाखल करण्यात आले आहे तिन्ही गुन्ह्यात 8-9 आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील 4 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपीचा शोध पोलिसांमार्फत घेतला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Maharashtra Live blog updates: राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार, आधीच 9 लाख 32 हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर, कालबाह्य योजना बंद होणार?
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Rohit Pawar on VSR: अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहित पवारांचा आरोप
काळ्या काचांची गाडी, शाही बडदास्त, VSR कंपनीच्या मालकाला सीआयडीकडून चौकशीवेळी व्हिआयपी ट्रिटमेंट: रोहित पवार
IND vs ENG T20 World Cup Semi Final : जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
जेव्हा वानखेडेवर बापूने इंग्रजांचा पराभव निश्चित केला; तेव्हा गौतम गंभीर खुर्ची सोडून पळत सुटला...; पाहा टर्निंग पॉइंटचा Unseen Video
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
Embed widget