Girish Mahajan : स्वप्न बघायला काही हरकत नाही. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकतात असेही सांगितलं. त्यांचं स्वप्न पंतप्रधान होण्याचं सुद्धा आहे, स्वप्न बघायला काही लागत नाही, ते त्यांनी बघावं असे महाजन म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालकमंत्र्याच्या संदर्भात निर्णय घेतली. मी कुंभमेळा मंत्री म्हणून काम करतोय. मला शाडो पालकमंत्री म्हणून अधिकार नाही. तिथे पालकमंत्री लागतो असे महाजन म्हणाले. 

यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅशनल हायवे रस्त्यांची कामे आहेत. गोटी त्रंबकेश्वर जवाहर हा रस्ता मुंबईत येणारं ट्रॅफीक हे गोटीच्या माध्यमातून त्रंबकेश्वर पर्यंत पोहोचेल. यासाठी 3700 कोटी रुपये खर्चून चार पदरी रस्ता करण्यात येणार आहे. नाशिक सिन्नर विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणारे राष्ट्रीय महामार्गाचा सोय होणार असल्यानं त्याचाही विस्तार केला जाणार आहे. द्वारका जंक्शन इंजिन नगर बोगदा यासह महत्त्वाच्या रस्त्यांच्या संदर्भात चर्चा झाली आहे अस महाजन म्हणाले. 

नाशिक रिंग रोड आहे. लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दीड दोन वर्षात सर्व काम पूर्ण करु असेही महाजन म्हणाले. जळगाव ते संभाजीनगर दरम्यान जोडण्यासाठी पर्याय शोधला आहे, जेणेकरुन मुंबईला पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे. द्वारका जंक्शनवरील वाहतूक कोंडी डोकेदुखी झालेली आहे. बोगद्याचा उपयोग होत नसल्याने, नवीन डिझाईन एमएसआरडीसीला करण्याचा सूचना दिलेली आहे. तीन महिन्यात कामाला सुरुवात होईल असे महाजन म्हणाले. 

स्वप्नातही पाहिले नसेल, इतके काम 11 वर्षात झालं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 11 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. आतापर्यंत जे काम झालं, स्वप्नातही पाहिले नसेल, इतके काम 11 वर्षात झालेलं आहे. अजून 4 वर्ष बाकी आहेत. अर्थव्यवस्था पुढे न्यायची आहे. हा ट्रेलर आहे. येणाऱ्या चार वर्षात काय काय होते ते पहावे असेही महाजन म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी संदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. निवडणूक आल्या की  लोक असे विषय हाती घेत असतात असेही महाजन म्हणाले. 

एकनाथ खडसे हे संघाच्या कार्यक्रमात आले होते. मला त्यांच्या नावाबद्दल फारसं माहीत नाही. त्यांचं नाव पत्रिकेत घेतलं नव्हतं. पण ते येऊन गेले. शासनाने पैसे दिले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम होता असे महाजन म्हणाले. सुधाकर बडगुजरचा प्रवेश घेतल्यावर एकनाथ खडसे म्हणाले त्यापेक्षा मी वाईट नाही. मला का घेत नाही. खडसे पक्षात येण्यासाठी किती उत्सुक आहे. ते प्रयत्न करतात असेही महाजन म्हणाले. मी लहान कार्यकर्ता आहे. ते दिल्लीत बोलते त्यांचे कनेक्शन दिल्लीत आहे. मी त्यांच्याबद्दल काही टिपणी करणार नाही असेही महाजन म्हणाले. ते राष्ट्रीय नेते आहेत. दिल्लीत त्यानं भाजपचा दुपट्टा टाकल्याचे ते बोलले होते. पण त्याचे फोटो समोर येत नसल्याचा टोलाही महाजन यांनी लगावला.