पुढच्या वर्षी लवकर या... राज्यभरात घरगुती गौरी-गणपतींचं विसर्जन
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2017 07:15 PM (IST)
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... गजरात राज्यभर घरगुती गणपती आणि गौराईचं विसर्जन करण्यात आलं.
मुंबई : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... गजरात राज्यभर घरगुती गणपती आणि गौराईचं विसर्जन सुरू आहे. विशेषतः कोकणात गणपतीचं गौरीबरोबरच विसर्जन केलं जातं. त्यामुळं कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते आहे. मुंबईतही गौरी-गणपतीचं विसर्जन सुरू आहे. सुरक्षेसाठी महत्त्वांच्या चौपाट्यांवर पालिका आणि पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल मोठ्या थाटामाटात गौरीचं घरोघरी पूजन करण्यात आलं. त्यानंतर आज भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. दरम्यान, गौरी-गणपतींचं विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं भक्तांना करण्यात येत आहे.