Iran Israel War : अमेरिका-इस्रायल-इराण (Iran Israel War) यांच्यात आजसलग 14 व्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. या युद्धाचा थेटफटकाआताजागतिक अर्थव्यवस्थेलाबसतअसून युद्धामुळे जगभरात आणि विशेषतः भारतात एलपीजी (LPG) गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका आता हॉटेल्स आणि कारखान्यांसोबतच शाळांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांनाही बसत आहे. परिणामीदेशातइंधन टंचाईचीमोठी समस्या निर्माणझालीआहे. अशातचआतायागंभीरविषयातमुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्यसरकारला घरगुती वापरासाठी आवश्यक एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करा असे निर्देश दिलेआहे. (Gas Shortage India)
सध्यादेशासहराज्यातउद्भवलेल्यागॅसटंचाईच्यापरिस्थितीबाबतमुंबई उच्च न्यायालयानेराज्यसरकारलाउपाययोजनेसंदर्भातमहत्वपूर्णनिर्देशदिलेआहे. या प्रकरणी 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिलेआहे. राज्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढविण्यासाठी कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या समक्ष सुनावणी झाली.
Gas Shortage India : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे निर्देश
अमेरिका इराण युद्धामुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, सीरियासह ईतर देशातून होणारा तेल पुरवठा बाधीत झाला आहे. त्याचा परिणाम एलपीजी उत्पादनावर पडल्याने ग्राहकांना एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भेडसावत आहे. त्यामुळे पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाने एलपीजी उत्पादन व पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश जारी केले असताना कॉन्फिडन्स कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी दुर्लक्ष करत आहे. याकरिता कॉन्फिडन्स कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र कंपनीने निर्यात धोरणाचे कारण देत नकार दिल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.
Gas Shortage India : भारतात दरवर्षी किती एलपीजी वापरला जातो?
अहवालांनुसार, भारत दरवर्षी अंदाजे 31.3 दशलक्ष टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वापरतो. या एकूण गरजांपैकी सुमारे 87 टक्के घरगुती स्वयंपाकात वापरला जातो. सर्वात मोठी चिंता अशी आहे की भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी 62 टक्के आयात केली जाते आणि या आयातीपैकी 85-90 टक्के होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. सौदी अरेबियासारख्या देशांमधून एलपीजी टँकर या मार्गाने भारतात पोहोचत असत.
