एक्स्प्लोर

गणरायाचे आगमन, मुंबईसह मराठवाड्यात पुन्हा जोर'धार'; नांदेड, लातूरमध्ये पाणीच पाणी, गावांचा संपर्क तुटला

मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, सकाळपासून सूर्यदेवाचे दर्शन दूर राहिला.

मुंबई : गणेशोत्सवाचे आगमन होताच यंदाही पावसाने (Rain) हजेरी लावली असून गेल्या 4-5 दिवसांपासून उघडीप दिलेला वरुणराजा आज पुन्हा कोसळला आहे. मुंबईसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठं नुकसान झालं असून लातूरमध्येही पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात मागील सोळा तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहापेक्षा अधिक मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. अरुंद आणि कमी उंचीच्या पुलांवरून पाणी वाहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे, सकाळपासून सूर्यदेवाचे दर्शन दूर राहिला. लातूर जिल्ह्यातील 10 पेक्षा अधिक मार्गावर वाहतूक ठप्पा झाली असून बोरगावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. येथील लेंडी नदीच्या पुलावरून पाणी जात असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, तसेच शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. 

उदगीर मुक्रमाबाद वाहतूक बंद, पुलावरुन पाणी

उदगीर मुक्रमाबाद रस्त्यावरील धडकनाळ या ठिकाणच्या अरुंद कठडे नसलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी तो पूल बंद करण्यात आला आहे. मागील 16 तासापासून सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. शेत शिवारात पाणी, नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत,. तसेच, अनेक गावातील सखल भागात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाला आहे. लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या दहा अरुंद पुलावरून पाणीही जात असल्याने ते पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

भंडाऱ्यात 4 बकऱ्या मृत्यूमुखी, महिला जखमी

भंडाऱ्यात आज आलेल्या मुसळधार पावसानं एका घराची भिंत कोसळली. या घटनेत एक गाय आणि चार शेळ्यांचा (बकऱ्या) मृत्यू झाला. तर एका महिलेसह एक गाय गंभीर जखमी झाली. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील निलागोंदी या गावात घडली. गंभीर जखमी महिलेला तातडीनं साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं कोसळलेल्या भिंतीचा मलबा काढून मृत आणि जखमी जनावरांना त्यातून बाहेर काढून जखमी जनावरांवर उपचार करण्यात आले. वैशाली वंजारी (35) असं गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नावं आहे.

यवतमाळ जिल्ह्यात जोर'धार' पाऊस

आठ ते दहा दिवसांच्या उघाडीनंतर यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोर'धार' पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून ढगाळी वातावरण होते, तर अडीच वाजताच्या सुमारास अचानक जोरधार पावसाने हजेरी लावली. पडलेला पाऊस कपाशीसाठी काहीसा फायदाचा ठरत असला तरी सोयाबीन आणि तूर या पिकांना अतिपाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

मनोज जरांगे मुंबईकडे, ओबीसी नेते नागपुरात; आरक्षण आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द
औषध निरीक्षक पेपरफुटीत सहभाग आढळल्यास आयोगातल्या व्यक्तीलाही कठोर शिक्षा होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा विद्यार्थ्यांना शब्द

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Embed widget