मुंबई  : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सहपरिवार गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी उद्या जाणार आहेत. उद्या सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती विराजमान होणार आहे. या गणेशोत्सवात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणपती दर्शनासाठी फोन करुन निमंत्रण दिलं असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गणपती राज ठाकरे यांच्या घरी विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे हे सहपरिवार राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दर्शनासाठी येणार आहेत.  

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली

दरम्यान, उद्धव ठाकरे आल्यानंतर खासदार संजय राऊत हे देखील सायंकाळी राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला येणार आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघेही भेटणार असून, त्यांच्या भेटीमुळे मनसे आणि ठाकरे गटातील युतीची चर्चा रंगली आहे. 27 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत. या भेटीचा राजकीय परिणाम काय असेल हे पाहणे महत्त्वाचे आहे. मिळालेल्या माहितनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या निमंत्रणासाठी उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे बोललं जात आहे. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब दादरमधील कृष्णकुंज या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी यावे, असे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरेंनीही हे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचे समजत आहे.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ 5 जुलै 2025 रोजी एकाच मंचावर दिसले होते. यानंतर 27 जुलै 2025 रोजी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या. यामुळे त्यांच्यातील बंधू प्रेम हे स्पष्ट पाहायला मिळत होते. त्यातच गेली अनेक वर्षे ठाकरे कुटुंबाने एकत्र सण साजरे केलेले नाहीत. त्यामुळं या वर्षीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र येऊन गणपती दर्शन करेल, असे बोललं जात आहे. मात्र, यामुळं समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Raj Thackeray On BEST Election Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मनसे-ठाकरे गटाला भोपळा; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, छोट्या...