Ganeshotsav 2023 Special Train:  मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यात 156 विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, पनवेल आणि पुणे या स्थानकातून या विशेष एक्स्प्रेस चालवण्यात येणार आहे.  दिवा-रत्नागिरी दरम्यान मेमू ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 


1) मुंबई-सावंतवाडी रोड स्पेशल (40 सेवा)-


 01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज मध्यरात्री 12.20 वाजता (00.20) वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.


 01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज दुपारी 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.


या गाडीचे थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.


एक्स्प्रेसमधीस कोच रचना: 18 स्लीपर क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.


2) लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (24 सेवा)


 01167 स्पेशल एलटीटी वरून 13, 14, 19, 20, 21, 24, 25, 26, 27, 28 सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 1.10, 2.10.2023 (12 ट्रिप) रोजी रात्री 22.15 वाजता सुटेल आणि  आणि कुडाळला दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता पोहोचेल


 01168 स्पेशल कुडाळ येथून 14, 15, 20, 21, 22, 25, 26, 27, 28, 29 आणि  2 आणि 3 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजता सुटेल. (12 ट्रिप) त्याच दिवशी रात्री 21.55 वाजता एलटीटीला पोहोचेल.


या गाडीचे थांबे: ठाणे, पनवेल, रोहा.  माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.


एक्स्प्रेसमधीस कोच रचना: एक टू टिअर वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 7 सामान्य द्वितीय श्रेणी.


 3) पुणे-करमाळी/कुडाळ-पुणे विशेष (6 सेवा)


 01169 विशेष गाडी 15.09.2023, 22.09.2023 आणि 29.09.2023 रोजी पुण्याहून सायंकाळी 18.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता कुडाळला पोहोचेल.


 01170 स्पेशल कुडाळहून 17.09.2023, 24.092023 आणि 01.10.2023 रोजी सायंकाळी 16.05 वाजता सुटेल आणि पुण्याहून दुसऱ्या दिवशी पहाटे 05.50 वाजता पोहोचेल.


थांबे: लोणावळा, पनवेल, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.


 संरचना:एक टू टिअर वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11  शयनयान, 6 जनरल सेकंड क्लाससह 2 गार्ड्स ब्रेक व्हॅन.


 ४) करमाळी-पनवेल-कुडाळ विशेष (साप्ताहिक) – 6 सेवा


 01187 स्पेशल 16.09.2023, 23.09.2023 आणि 30.09.2023 (3 ट्रिप) रोजी करमाळी येथून दुपारी 14.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 02.45 वाजता पनवेलला पोहोचेल.


 01188 स्पेशल पनवेलहून 17.09.2023, 24.09.2023 आणि 1.10.2023 (3 ट्रिप) रोजी पहाटे 05.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.00 वाजता कुडाळला पोहोचेल.


 थांबे: थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, काकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, रोहा आणि माणगाव.


 संरचना: एक टिअर वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित , 11 शयनयान क्लास, 2 गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.


 5) दिवा – रत्नागिरी मेमू स्पेशल  (40 सेवा)


 01153 स्पेशल दिवा येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 07.10 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.55 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.


 01154 विशेष गाडी 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दरम्यान 15.40 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी 22.40 वाजता दिवा येथे पोहोचेल.


 थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.


 संरचना: 12 कार मेमू रेक


 6) मुंबई - मडगाव विशेष साप्ताहिक ४० सेवा


 01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) पर्यंत दररोज 11.50 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 02.10 वाजता मडगावला पोहोचेल.


 01152 स्पेशल मडगावहून 13.09.2023 ते 02.10.2023 (20 ट्रिप) दररोज 3.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.


 थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.


 संरचना: 18 शयनयान क्लास, एका गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.