Gadchiroli News गडचिरोली : राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. संवेदनशून्यतेचा कळस म्हणजे खात्यावरील पैसे काढण्यासाठी कोमात असलेल्या वृद्ध महिलेला थेट बँकेत न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यातील पोर्ला येथील बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखेत घडला आहे. घडलेल्या या प्रकाराविरुद्ध गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून सबंधित बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Gadchiroli News : बँकेच्या हेकेखोर धोरण, कोमात असलेल्या वृद्ध महिलेला थेट बँकेत न्यावे लागल्याचा प्रकार
मिळेलेल्यामाहितीनुसार, पोर्ला परिसरातील काटली येथील वृद्ध महिला शांताबाई मानकर या मागील काही दिवसापासून कोमात आहेत. त्यांना औषधोपचारासाठी पैशाची गरज असल्याने त्यांची मुलगी आणि जावई यांनी अंगठ्याचा ठसा घेऊन येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत गेले होते. मात्र त्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही, अशी भूमिका घेतली. वास्तविक गंभीर आजारी खातेधारकाच्या नातेवाईकाला मेडिकल सर्टिफिकेट मागणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्याने बँकेच्या हेकेखोर धोरणामुळे जावई आणि मुलीला गंभीर आजारी कोमात असलेल्या शांताबाई यांना बँकेत घेऊन जावे लागले.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 10.48 कोटींची मदत जमा; शेतकऱ्यांनी तातडीनं ई-केवायसी करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन
भंडारा जिल्ह्याला गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचा मोठा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे पिकं मातीमोल झाली होती. या संकट काळातून सावरण्यासाठी शासनानं भंडारा जिल्ह्यासाठी 14 कोटी 87 लाखांचा निधी मंजूर केला होता. यापैकी 10 कोटी 48 लाखांचा निधी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. 27 हजार 302 शेतकऱ्यांच्या 9 हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचं नुकसान झालं होतं. यामध्ये भात, सोयाबीन, कापूस, तूर, हळद, केळी आणि भाजीपाला या प्रमुख पिकांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे अडकले आहेत, त्यांनी त्वरित जवळच्या केंद्रावर किंवा बँकेशी संपर्क साधून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
