Gadchiroli : गडचिरोली पोलिसांचे c 60 चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी 2 तास जोरदार चकमक झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिणी टोकावर महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर "कवंडे" जवळ (महाराष्ट्राच्या सीमेत) ही चकमक घडली आहे. कालच गडचिरोली पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की भामरागड दलम चे नक्षलवादी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर कवंडे जवळ कॅम्प लावून थांबले आहेत. त्यानंतर काल रात्री उशिरा c 60 च्या 200 जवानांनी ॲडिशनल एसपी एम रमेश यांच्या नेतृत्वात सर्च ऑपरेशन राबवले होते.
आज सकाळी थोड्या थोड्या वेळानंतर त्याच परिसरात तीन ठिकाणी चकमक झाली. सुमारे दोन तास ह्या चकमकी चालल्या. जवानांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रतिउत्तर दिल्यामुळे नक्षलवादी पळून गेले. मात्र, काही नक्षलवादी जखमी झाले असून त्यांना नक्षलवादी सोबत घेऊन गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन बंदुकी, मोठ्या संख्येने जिवंत काडतूस व इतर नक्षली साहित्य जप्त केले असून नक्षलवाद्यांचे कॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. सध्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. छत्तीसगड राज्याच्या दंतेवाडा, बिजापूर क्षेत्रातील गीदम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गीरसापारा, नेलगोडा, बोडगा आणि इकेली जंगल परिसरात नक्षलवादी कॅम्प लागल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली आहे. य भागात नक्षलवादी असल्याने पोलिस प्रशासन सतर्क आहे.
काही दिवसांपूर्वी येथील कारवाईत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी येथील कारवाईत 30 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. विजापूर-दंतेवाडा सीमेवरील नक्षलवाद्यांच्या मुख्य भागात सैन्याने प्रवेश करत नक्षलवाद्यांच्या मोठ्या टोळीला घेरले होते. या कारवाईत नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. तर, काही दिवसांपूर्वी 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. तेलंगणातील (Telangana) कोठागुडेम जिल्ह्यातील 64 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत आपलं शस्त्र खाली ठेवलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune News: 15 वर्षांपासून अंडरग्राऊंड! नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप एटीएसच्या जाळ्यात कसा सापडला?