गडचिरोलीत माजी आमदाराच्या बॉडीगार्डची नक्षलवाद्यांकडून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 14 Apr 2016 09:41 AM (IST)
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या जयंती कार्यक्रमात गेलेल्या माजी आमदार दीपक अत्राम यांच्या अंगरक्षकाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील थल्लेवाडा इथे ही घटना घडली. माजी आमदार दीपक अत्राम बाबासाहेबच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात गेले होते. मात्र यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात अत्राम यांचे अंगरक्षक नानाजी नागोसे यांचा मृत्यू झाला. तर दीपक अत्राम थोडक्यात बचावले.