गडचिरोली : गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग पेरला होता. शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील 7, भंडारामधील 3, बुलडाणामधील 2, हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे.
भूसुरुंग स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे.
शहीद जवानांची नावे
1. दयानंद ताब्रध्वज शहारे (भंडारा)
2. आग्रमण बक्षी राहाटे (यवतमाळ)
3.सर्जेराव एकनाथ खार्डे (बुलडाणा)
4. किशोर यशवंत बोबाटे (गडचिरोली)
5. संतोष देविदास चव्हाण (हिंगोली)
6. राजू नारायण गायकवाड (बुलडाणा)
7. लक्ष्मण केशव कोडाप (गडचिरोली)
8. शाहुदास बाजीराव मडावी (गडचिरोली)
9. नितीन तिलकचंद घोरमारे (भंडारा)
10. पुरणशाहा प्रतापशाहा दुग्गा (गडचिरोली)
11. प्रमोद महादेवराव भोयर (गडचिरोली)
12. तौशिब आरिफ शेख (बीड)
13. अमृत प्रभुदास भदाडे (नागपूर)
14. योगेश सिताराम हलामी (गडचिरोली)
15. अशोक जितरू वटटी (गडचिरोली)
या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.सरकार नक्षलवाद्यांविरोधात ठोस पाऊल उचलण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारला पायउतार करण्याशिवाय पर्याय नाही. आपण जवानांच्या हत्या बघायच्या आहेत का? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
VIDEO : गडचिरोली नक्षलवादी हल्ला : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांची मागणी