Gadchiroli : कार्यालयीन वेळेत खर्रा खाऊन कर्तव्य बजावणाऱ्या एका लिपीकाला गडचिरोलीचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे (MLA Dr Milind Narote) यांनी खडेबोल सुनावत एक हजार रुपयांचा दंड शासकीय तिजोरी भरायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. यावरुन कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांकडून धूम्रपणाचा विषय चर्चेत आला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या तक्रारींना घेऊन डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर गुरुवारी धडक दिली. यावेळी येथे कुणीही अधिकारी उपस्थित नव्हते. तेव्हा एका लिपिकाला विचारणा केली असता, तो तोंडात खर्रा चगळत बसला होता. त्यामुळे त्याला बोलणेही जमत नव्हते. या प्रकारामुळे संतापलेल्या आमदारांनी लिपिकाला तात्काळ एक हजार रुपयाचा दंड शासकीय कोषात भरायला लावला. त्याची शासकीय पावतीही फाडण्यात आली. घडलेल्या या प्रकाराची प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. डॉ. मिलिंद नरोटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून ओळखले जातात. ते गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. एक अभ्यासू आमदार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.
आदिवासी आणि माओवादग्रस्त प्रदेशात आरोग्यसेवा आणि शिक्षण सुधारण्यासाठी काम
आदिवासी आणि माओवादग्रस्त प्रदेशात आरोग्यसेवा आणि शिक्षण सुधारण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी डॉक्टर मिलिंद नरोटे ओळखले जातात. पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवतात. डॉ. नरोटे यांचे तळागाळातील संबंध आणि वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे ते महाराष्ट्रात विकास आणि सामाजिक कल्याणावर लक्ष केंद्रित करणारे एक लोकप्रिय युवा नेते बनले आहेत. संबंधित मिलिंद रामजी नरोटे यांनी गडचिरोली महाराष्ट्रातील विकास आणि सामाजिक कार्यात कसे योगदान दिले आहे गडचिरोलीमध्ये आदिवासी कल्याण आणि महिला सक्षमीकरणासाठी आमदार मिलिंद रामजी नरोटे यांनी कोणते उपक्रम हाती घेतले आहेत.
राजकारणात येण्यापूर्वी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारी डॉक्टर म्हणून काम
राजकारणात येण्यापूर्वी, डॉ. नरोटे यांनी गडचिरोली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सरकारी डॉक्टर म्हणून काम केले, जिथे त्यांनी आदिवासी आणि ग्रामीण लोकसंख्येसमोरील आरोग्यसेवेच्या आव्हानांना प्रत्यक्ष पाहिले. त्यांच्या सुरुवातीच्या सक्रियतेमध्ये आरोग्य शिबिरे चालवणे आणि ग्रामीण आरोग्य आणि सामाजिक संपर्कावर लक्ष केंद्रित करणारी 'स्पंदन फाउंडेशन' ही स्वयंसेवी संस्था सुरू करणे समाविष्ट होते.
महत्वाच्या बातम्या: