Gadchiroli HSC 12th Exam : राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्य मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत. अशातच गडचिरोलीच्यापरीक्षा केंद्रावर एकधक्कादायकप्रकार (Board Exam Copy) घडल्याचेसमोरआलंआहे. बारावीच्या (HSC Exam 2026) राज्यशास्राच्या पेपरदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो बाहेर पाठवून प्रश्नांची उत्तरे चक्क चॅट जीपीटीवरून शोधून त्या उत्तरांची प्रिंट कॉपी परीक्षा केंद्रावर आणण्याचा धक्कादायकप्रकारघडलाआहे. चामोर्शी येथील जा. कृ. बोमनवार कनिष्ठ विज्ञान व कला महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर याप्रकार घडलाय.

Continues below advertisement

Gadchiroli HSC 12th Exam :  तीन शिक्षकांसह शिपायाला निलंबित करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश,गुन्हा दाखल

दरम्यान, सामुहिक कॅापीचा प्रयत्न करण्याचा हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या केंद्र भेटीदरम्यान उघडकीस आणला. याप्रकरणी केंद्र प्रमुख आणि इतर दोन शिक्षकांसह शाळेच्या शिपायाला निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहे. तर त्या चारही जणांवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी रोजी राज्यशास्र विषयाचा पेपर सुरू असताना सीईओ सुहास गाडे यांच्या भरारी पथकाने भेट दिली. यावेळी परीक्षा केंद्राबाहेर चालू विषयाच्या मायक्रोनोट्स, तसेच राज्यशास्त्र विषयाच्या चालू असलेल्या पेपरचे प्रश्न चॅट जीपीटीवरुन प्रिंट आऊट काढलेले मिळून आले. सीईओ गाडे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याचा जाब विचारत चौकशी समिती गठीत केली. चौकशी समितीने आपल्या अहवालात सामूहिक कॉपीचा प्रयत्न झाल्याचे नमुद केल्याने प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे यांच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलिसांनी परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराला जबाबदार धरून तीन शिक्षक आणि एका शिपायाविरूद्ध गुन्हा दाखल केला. तर त्यांना निलंबित करण्याचा आदेश शिक्षण विभागाने संबंधित संस्थेला शिक्षणाधिकारी यांनी दिले आहेत.

Continues below advertisement

Beed News: पेपरचे चिट दगडात गुंडाळून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा; गेवराईतील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरील प्रकार समोर

बीडच्या गेवराईतील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या कॉपी पुरवठ्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय. यंदाच्या बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पावलं उचलली. परंतु पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आले. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला. पेपरचे चीट एका दगडात गुंडाळून खिडकीद्वारे फेकण्याचा प्रकार यातून दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणात 17 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागात हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI