FYJC 11th Admission : दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरु होते. अकरावी प्रवेशासाठी काही काळ वाट पाहिल्यानंतर अखेर आजपासून ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरवात होत आहे. आजपासून विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा भाग 1 भरायचा आहे तर 17 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत भाग 2  भरायचा आहे. 


यावर्षीची अकरावी प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग1 नेमका कसा भरायचा?  भाग2 मध्ये कॉलेज पसंती क्रमांक निवडताना नेमका कसा विचार करावा ? प्रवेश प्रक्रियेदरम्यान अडचणी आल्यास नेमके पर्याय आहेत? याबाबत मुंबई विभागीय उपसंचालक संदीप संगवे यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला.


विद्यार्थ्यांना आज सकाळी 11 वाजेपासून प्रवेश अर्जाचा भाग 1 भरता येईल. यामध्ये अर्ज भरण्यापूर्वी सुरवातीला विद्यार्थ्यांनी लॉग इन आयडी पासवर्ड संकेतस्थळावर जाऊन मिळवायचा आहे. लॉग इन केल्यानंतर अर्जाचा भाग 1 विद्यार्थ्यांना भरता येईल. यामध्ये विद्यार्थी कोणत्या बोर्डाचा आहे? विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, पत्ता, दहावीत मिळालेले गुण, कोणत्या कॅटेगरी मध्ये विद्यार्थी येतो त्याबाबतची माहिती भरायची आहे.


FYJC Admission 2021 : अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर, अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू


विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी 22 ऑगस्टपर्यंत वेळ असेल.  14 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यत अर्जाचा भाग-2 भरायचा आहे त्यामध्ये कॉलेजचे पसंती क्रमांक द्यायचे आहेत. कॉलेजचे पसंती क्रमांक देताना विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजच्या मागील वर्षीचा कट ऑफ पाहून त्यानुसार कॉलेजचे पसंती क्रमांक अर्जमध्ये भरावे. 27 ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याला पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले तर ते विद्यार्थ्याला घेणे अनिवार्य असेल अन्यथा दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीचे कॉलेज असेल तर विद्यार्थी विचार करून दुसऱ्या फेरीमध्ये कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो.


विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचण आल्यास आपल्या शाळेत किंवा मार्गदर्शन केंद्रावर जाऊन अडचणी दूर करू शकतो. यावर्षी अकरावी प्रवेश साठी खास मोबाईल ॲपची निर्मिती सुद्धा करण्यात आली आहे. त्यावरुन सुद्धा विद्यार्थी अर्ज भरू शकतो.


संकेतस्थळ-https://11thadmission.org.in


ईमेल- doecentralize11state@gmail.com 



कसे असेल अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ?



  • 14 ऑगस्टपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

  • 14 ते 22 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशसाठी अर्ज भाग - 1 भरता येणार

  • विद्यार्थ्यांना फॉर्म व्हेरिफाय करण्यासाठी जवळच्या कॉलेज, मर्गदर्शक केंद्रावर जाऊन व्हेरिफाय करावे

  • 17 ऑगस्ट सकळी 10 वाजल्यापासून ते 22 ऑगस्ट रात्री 11 पर्यत

  • विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग 2 भरायचा आहे

  • यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेजचे पसंती क्रमांक भरायचे आहेत

  • या दरम्यान विद्यार्थ्यांना अकरवी प्रवेशासाठी उपलब्द जागांची माहिती देण्यात येईल

  • 23 ऑगस्ट सकाळी 10 ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होणार

  • अर्जात विद्यार्थ्यांना सुधारणा करण्याची असल्यास या दरम्यान वेळ दिला जाणार

  • 25 ऑगस्टला अंतिम सर्वसाधरण गुणवत्ता यादी जाहीर होणार

  • 27 ऑगस्ट सकळी 10 वाजता  पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार

  • विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत  कॉलेज मिळणार

  • पहिल्या यादीनंतर कॉलेजचे कट ऑफ संकेतस्थळवर जाहीर होणार

  • 27 ऑगस्ट सकाळी 10 ते 30 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत

  • विद्यार्थ्यांना आपल्याला मिळालेले पसंतीचे  कॉलेज निश्चित करायचे आहे

  • अन्यथा पुढील फेरीसाठी पर्याय उपलब्ध असेल

  • 30 ऑगस्ट रात्री 10 वाजता दुसऱ्या गुणवत्ता यादी साठी उपलब्ध जागा संकेतस्थळावर जाहीर केल्या जातील