Mangalprabhat Lodha :  मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज भंडाऱ्यात मोठी घोषणा केली आहे. नवीन शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट कोर्सेस सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे. चार महिन्यात चार नवीन कोर्सेस शिकवले जाणार असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 

Continues below advertisement

केवळ टेक्निकली नॉलेज घेऊन फायदा नाही

केवळ टेक्निकली नॉलेज घेऊन फायदा नाही. तर, यापुढे आता शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातूनही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मार्केटिंग अँड फायनान्स, मॅनेजमेंट कोर्स आणि लोकल अथॉरिटीचाही अभ्यास सर्वांना व्हावा यासाठी पुढील शैक्षणिक क्षेत्रापासून राज्यात चार महिन्याचे चार नवीन शॉर्ट कोर्सेस सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व आयटीआयमध्ये सुद्धा सुरू करावा, अशी घोषणा राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली. भंडारा इथं आयोजित आपातकालीन अभ्यासक्रम अंमलबजावणीबाबत, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनाबाबत आढावा बैठकीत ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

पुढील नवीन शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट कोर्सेस सुरु होणार

शॉर्ट टर्म कोर्सेस अलग अलग जागेवर सुरू करायचे आहेत. पुढील नवीन शैक्षणिक सत्रापासून चार नवीन शॉर्ट कोर्सेस चार महिन्यात चार नवीन शिकवले जाणार आहेत. पहिल्या महिन्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, दुसऱ्या महिन्यात मार्केटिंग आणि फायनान्स, तिसऱ्या महिन्यात मॅनेजमेंट कोर्स आणि चौथ्या महिन्यात लोकल अथॉरिटीच्या हिशोबाने अभ्यासक्रम चार महिन्यात चार कोर्स शिकवले जाणार आहेत. केवळ टेक्निकली नॉलेज घेऊन काही फायदा नाही. आपण कुठल्याही कंपनीत जा तिथे एमडी किंवा सीईओ हा कधीही टेक्निकली नसतो. कुठल्याही कंपनीत असलेला कर्मचारी हा मॅनेजमेंटचा कोर्स किंवा मार्केटिंगचा कोर्स केलेला असावा. हा कोर्स पुढील सत्रापासून गव्हर्नमेंट आयटीआयमध्ये सुद्धा सुरू करावा, यात 50 टक्के विद्यार्थी हे नॉन आयटीआयचे भरावे आणि 50 टक्के शिक्षक नॉन आयटीआयचे भरावे असेही ते म्हणाले. 

Continues below advertisement

दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ टेक्निकली नॉलेज घेऊन फायदा नाही. तर, यापुढे आता शॉर्ट टर्म कोर्सेसच्या माध्यमातूनही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मार्केटिंग अँड फायनान्स, मॅनेजमेंट कोर्स आणि लोकल अथॉरिटीचाही अभ्यास सर्वांना व्हावा यासाठी पुढील वरषापासून चार नवीन कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार महिन्यात चार कोर्स शिकवले जाणार आहेत.