जळगाव : एकाच कुटुंबातील चार जणांची राहत्या घरात हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील भादली गावातील हा प्रकार आहे. दरोडेखोरांनी हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पती-पत्नी यांच्यासह दोन मुलांची दरोडा टाकताना हत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागलेला नाही.
जळगाव शहरासह इतर परिसरातही चोऱ्यांचं सत्र सुरु आहे. त्यामुळे घरावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातूनच ही हत्या झाली असावी, असा अंदाज आहे. दरम्यान चार जणांच्या हत्येमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.