Shahajibapu Patil on Sanjay Raut : कोणाला काही कळत नाही असं समजून संजय राऊत (Sanjay Raut) बडबडत असतो, असे सांगत शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil ) यांनी राऊतांची खिल्ली उडवली. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचावे. महाभारतातील संजय हा श्रीकृष्णाजवळ बसलेला नव्हता तर अंधळ्या ध्रुत राष्ट्राजवळ बसलेला होता. त्यामुळं संजय राऊताला उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत असे म्हणायचे होते असेही शहाजीबापू म्हणाले.
राऊतांच्या टीकेला शहाजीबापूंचं प्रत्युत्तर
काल संजय राऊत यांनी मातोश्रीवर बोलताना स्वतःला महाभारतातला संजय आणि उद्धव ठाकरेंना कृष्णाची उपमा दिली होती. यावर आज शहाजीबापूंनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. खेळाची मैदान वेगळी असतात आणि राजकारण धर्माच्या बाजू या वेगळ्या असतात. क्रिकेट हा जागतिक पातळीवरचा खेळ आहे. त्यामुळं संपूर्ण देशाचे प्रतिनिधी येणार आहेत. कोण कुठल्या धर्माचा आहे, म्हणून खेळ थांबणार नाही. खेळाच्या मैदानाकडे बघत असताना सर्वांनी निरपेक्ष बुद्धीने पहावे पूर्वग्रह दूषित काहीतरी युक्ती हुडकून काढायची आणि रान पेटवायचा धंदा राऊतांनी बंद करावा असे उत्तर संजय राऊत यांना दिले. पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहसीन नकवी यांच्या हातात हात घालून अशीष शेलार काम करणार आहेत. दुसरं कोणी असतं तर गोंधळ घालून राजीनामा मागितला असता अशी टीका राऊत यांनी केली होती यावर बोलताना राऊतांनी टीका केली.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
आमच्या पक्षात सहदेव आले आहेत. महाभारतातील तीन पात्रे येथे उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे श्रीकृष्ण, मी संजय आहेच आणि सहदेव हे फार महत्त्वाचे पात्र होते. धर्मराजाच्या अत्यंत जवळचे कोण असेल, तर सहदेव होता. आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आलेला आहे. आपण सगळे शिवसैनिक आहात. सहदेवांच्या येण्याने कोकणातील कुरुक्षेत्रावर जे नवे महायुद्ध सुरू झाले आहे, ते युद्ध आपण जिंकणार आहोत, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. रत्नागिरीतील काँग्रेसचे सहदेव बेटकर यांनी मातोश्री येथे ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना संजय राऊतांनी स्वत:ला महाभारतातील संजयाची उमपा दिली होती. त्यावर शहाजीबापू यांनी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या: