मालेगाव : काही दिवसांपूर्वी मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा (Malegaon Former Mayor Abdul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणावरून मालेगाव मध्य मतदारसंघाचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (Maulana Mufti Mohammad Ismail) यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख (Asif Shaikh) यांच्यावर विधानसभेत गंभीर आरोप केला आहे. यामुळे मालेगावमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक (Abdul Malik) हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार (Firing) करून फरार झाले. या गोळीबारात अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर मालेगावात तणावाचे वातावरण झाले होते. यानंतर एमआयएमसचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी अब्दुल मलिक यांची भेट घेत घटनेची चौकशी केली होती. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली होती.
आमदार मौलाना मुफ्तींचा सनसनाटी आरोप
आता मालेगाव गोळीबार प्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी विधानसभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव गोळीबार प्रकरणात आसिफ शेख हे मास्टर माईंड असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात पकडलेले शूटर हे हमाल असून मुख्य आरोपी नाहीत. घटनेतील मास्टर माईंडला अटक करावी, अशी मागणी त्यांनी विधानभवनात केली आहे. मुफ्ती इस्माईल यांच्या आरोपामुळे मालेगाव शहरातील राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूर्व वैमस्यातून झाला होता गोळीबार
दरम्यान, या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले. जमिनीचे खरेदी-विक्री प्रकरण व पूर्व वैमस्यातून हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Hit & Run : नाशिक हिट अँड रन प्रकरणी मोठी अपडेट, मुख्य संशयित स्वतःच न्यायालयात हजर
Nashik Crime : येवल्यातील 'त्या' प्रकरणाला वेगळं वळण, मारहाण झालेल्या तरुणावरच पोक्सो गुन्हा दाखल