सिंधुदुर्ग: सलग आलेल्या चार सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजल्याचं चित्र आहे. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे आणि हिरवाईने नटलेला कोकणाला पर्यटकांची पसंती मिळत आहे. देशभरातून पर्यटक सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला, दांडी, कुणकेश्वर, देवगड समुद्र किनाऱ्यावर पर्यटनाची गर्दी आहे. स्कुबा, बनाना राईड, जेट की, पँरासिलिंग या साहसी समुद्री खेळाचा पर्यटक आनंद लुटत आहेत. 


कोकण हे राज्यांतील सर्वात चांगलं पर्यटन स्थळ आहे. कोकणातील समुद्र किनारे, या ठिकाणची खाद्य सांस्कृती, सिंधुदुर्ग किल्ला, स्थानिक लोक यामुळे कोकणात पर्यटकांना यावसं वाटतं. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटनाला कुठे जात आलं नाही. मात्र आता सर्व खुलं झाल्याने पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली आहेत. पर्यटकांची पहिली पर्यटनासाठी कोकणाची निवड करताना दिसत आहेत. 


सिंधुदुर्ग जगातील सुंदर 30 पर्यटनांच्या यादीत
कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. या महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे, म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. तसेच स्कुबा डायव्हिंगची सोय, समुद्री जीवनाचे दर्शनाची सोयही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नाकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 


ABP Majha