हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्यावर खपवून घेणार नाही, सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही : नितेश राणे
बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी असल्याने मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्क्याला भेट दिली. सरकार याबाबत गंभीर आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आल्याचे ते म्हणाले.

Nitesh Rane visited Bhaucha Dhakka : बांगलादेशी Xडे फार वळवळ करत आहेत. हे काही कराचीचे बंदर नाही, हे हिंदू राष्ट्रातील हक्काचे बंदर आहे. जो काही प्रकार आमच्या भगिनींसोबत झाला तो काही आम्ही सहन करणार नाही, मी इथून ही धमकी देऊन जात आहे. इथून पुढे काही घडलं तर पोलिसांना काही कळवणार नाही, मग तुम्हाला पाकिस्तानातील अब्बांकडे तुम्हाला पाठवून देऊ, वळवळ लगेच बंद करावी, असे मंत्री मस्त्यविकास नितेश राणे यांनी म्हटले आहे. सर्वधर्मसमभाव आम्ही मानत नाही, त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आला असल्याचे ते म्हणाले. बांग्लादेशी मच्छीमारांविरुद्ध तक्रारी असल्याने मस्त्यविकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्क्याला भेट दिली. सरकार याबाबत गंभीर आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री इथे आल्याचे ते म्हणाले.
ज्याला व्हीडिओ दाखवायचा आहे त्याला दाखवा
राणे यांनी म्हटले आहे की, कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या मला इथे दिसला तर मी त्याला आपल्या पायावर मस्जिदीमध्ये जाऊ देणार नाही. ज्याला व्हीडिओ दाखवायचा आहे त्याला दाखवा. रोहिंग्या नावाची घाण आम्हाला नको आहे. आपल्या लोकांनी देखील हे समजून घ्यावे. हिंदूंना मुस्लिमांची भीती नाही हिंदूंना हिंदूंची भीती आहे असं सावरकर म्हणाले होते. हिरव्या सापांना मदत करणाऱ्यांची नावं द्या त्यांचे देखील कार्यक्रम करतो. इथं मच्छी विकण्याचा व्यवसाय फक्त हिंदुंनाच करण्याची मुभा आहे. कुठलाही बांगलादेशी रेहिंग्याला परवानगी नाही. परत एकदा धमकी देतोय, एक नख जरी लावलं तर शुक्रवारी सिलेंडर वर येणार नाही.
हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्यावर खपवून घेणार नाही
अनधिकृत मदरसे मस्जिद इथे ठेवायचे नाही, पुढे काय करायचं ते बघू. तुम्ही एकत्र राहिला तर आजूबाजूला देखील लोकं फिरकणार नाही. हिंदू समाजाचे लोकं आहेत त्यांनाच बसायला द्या. कारवाई करण्याचे अधिकार केंद्र आणि राज्याला असल्याचे ते म्हणाले. नितेश राणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कोळी बांधवांनी भेटलो. इथं काही बांगलादेशी रोहिंगे अवैधपणे आहेत. आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करू देत नाही. महिलांवर हात उचलले, तक्रार माझ्याकडे आली. म्हणून हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते इथे आज आलो. केंद्र सरकारने कडक नियम लावले आहे. एकही बांधकादेशी रोहिंगे इथं राहता कामा नये. हिरव्या सापांची वळवळ भाऊच्या धक्क्यावर खपवून घेणार नाही. यापुढे भाऊच्या धक्क्यावर बारीक लक्ष असेल. हे कराची बंदर नाही. भाऊचा धक्का आहे. प्रत्येक कागदपत्र तपासली जातील, बांगलादेशीवर कडक कारवाई केली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या






















