जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये पोलिस आणि फरार आरोपी यांच्यात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागून आरोपी जखमी झाला आहे.

Continues below advertisement


चाळीसगावातील पुनसी पेट्रोल पंपाजवळील ही घटना आहे. आज सकाळी साडे आठ वाजता ही घटना घडली. पुणे ग्रामीण पोलिस आणि जळगाव पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली.


दरम्यान गोळीबाराच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.