नागपुरात बांधकाम सुरु असलेल्या रुग्णालयाला लागलेली आग नियंत्रणात
एबीपी माझा वेब टीम | 09 Jan 2019 03:21 PM (IST)
एलआयसी ऑफिसच्या परिसरातील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानक परिसरातील बांधकाम सुरु असलेल्या किंग्ज वे रुग्णालयात लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून अडकलेल्याची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. एलआयसी ऑफिसच्या परिसरातील या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागली तेव्हा अनेक कामगार इमारतीत अडकले होते. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची सुटका करण्यात आली आहे.