औरंगाबाद : औरंगाबादमधील तूर खरेदी केंद्रावर आज शुक्रवारी शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला. तूर गुणवत्ता निकषांवरुन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यावर नाराजी नोंदवत शेतकऱ्यांनी तूर जाळण्याचा प्रयत्न केला आहे.


चांगल्या प्रतीची तूर खरेदी करण्यास खरेदी केंद्र नकार देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली तूर जाळण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विभागवार तुरीची ओळख करण्यासाठी सुतळीच्या रंगाचा आधार घेतला जात असल्यानं तूर खरेदीला आधीच उशीर होत आहे. त्यात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्यानं शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.