शिर्डी : पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्याचा चर्चेचा प्रस्ताव धुडकावला आहे. तसंच येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णयावर असल्याचं संपकरी शेतकरी आंदोलकांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांमार्फत संपावर जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईत चर्चेसाठी येण्याचा प्रस्ताव दिला होता.


पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव धुडकावत चर्चेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मुख्यमंत्र्यांना चर्चा करायची असेल तर उद्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पुणतांब्यात यावं असा अल्टिमेटमही शेतकऱ्यांनी दिला आहे. सोबतच आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं आंदोलक शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.

येत्या 1 जूनपासून शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर 25 तारखेपासून पुणतांब्यात शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभावासह अनेक मागण्यांसाठी शेतकरी एक जूनपासून संपावर जाणार आहेत.

संबंधित बातम्या :

पहिल्यांदाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा संपाचा इशारा

शेतकऱ्यांच्या प्रस्तावित संपात उभी फूट, एका गटाची माघार

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडतंय: शिवसेना

एक जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार!