Raju Shetti on Bjp : सध्या महाराष्ट्र सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामधील राजकीय अस्थिरतेवरुन शेट्टी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं शेट्टी म्हणाले.


उद्या भाजपवरसुद्धा असी वेळ येईल


ज्या पक्षाचे नाव घेऊन निवडून येतात आणि नंतर त्या पक्षालाच विसरतात. ही प्रवृत्ती वेगानं वाढत आहे. देशामध्ये या वृत्तीला प्रस्थापित राज्यकर्ते खतपाणी घालतात हे दुर्दैव असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. आज उद्या भारतीय जनता पक्षासारख्या मोठ्या पक्षावरसुद्धा  अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही,  तेव्हा काळाची पावले ओळखा असेही शेट्टी यावर म्हणाले. एखादा पक्ष किंवा संघटना उभा करण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे ज्याचं त्यालाच माहित आहे. अशा पद्धतीनं एखाद्या पक्षाची वाताहत होतेय त्यामुळं वाईट वाटत असल्याचे शेट्टी म्हणाले. 


हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक


शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. या सर्वामागे भाजप असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्यावरुन राजू शेट्टी यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडं असलेल्या ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय या तीन अतिशय प्रभावी कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच राज्य सरकार पाडण्याच्या उलथापालथी होत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. भाजप ज्या पद्धतीनं पाशवी वृत्ती दाखवून मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र मधील महाविकास आघाडीचे सरकार पाडतेय हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक असल्याचं शेट्टी यांनी म्हटले आहे. तसेच महाविकास आघाडीचं सरकार पडतय त्याचं मला अजिबात दुःख नाही. कारण आम्ही दोन महिन्यापूर्वी या सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला आहे. कारण हे सरकार आता जनताभिमुख राहिलेलं नाही हे स्पष्ट झालं असल्याचे देखील शेट्टी म्हणाले.


महाविकास आघाडी सरकार संकटात 


शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 40 हून अधिक आमदारांसोबत शिंदे हे आसाममधील गुवाहटी या ठिकाणी आहेत. गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर 37 शिवसेना आमदारांच्या सह्या आहेत. मागील दोन दिवसात दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बुधवारी पाठवलेल्या प्रस्तावात 34 आमदारांच्या सह्या होत्या. त्यात नितीन देशमुख यांच्या सही बाबत वाद होता. आता नव्याने 37 आमदारांच्या सह्याचं पत्र पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे. हे पत्र विधानसभा सचिव, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळं राज्य सरकार संकटात सापडलं आहे. त्यामुळं आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


महत्वाच्या बातम्या: