पावसाची आकडेवारी दाखवली कमी, अनुदान वगळले, शेतकऱ्यांचं थेट गोदावरीच्या पात्रात जलसामाधी आंदोलन
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र स्कायमेट या संस्थेने पावसाची आकडेवारी कमी दाखवली होती.
Parbhani : परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र स्कायमेट या संस्थेने पावसाची आकडेवारी कमी दाखवली होती. त्यामुळं हे मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या घटनेच्या निशेधार्थ आज पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरीत जलसमाधी आंदोलन केले. ढालेगाव बंधाऱ्यात प्रवेश करुन थेट अनेक शेतकरी हे गोदावरी पात्रात उतरल्याचं पाहायला मिळालं.
दोन तास शेतकऱ्यांनी गोदावरीच्या नदीपात्रात आंदोलन केलं
जवळपास दोन तास शेतकऱ्यांनी गोदावरीच्या नदीपात्रात हे आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. शेवटी घटनास्थळी तहसीलदार, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी पोहोचले. त्यांनी 27 ऑक्टोबर रोजी याबाबत कंपनी शेतकरी आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले होते. या पुराचं पाणी अनेकांच्या घरात शिरलं होतं. त्यामुळं संसार उघड्यावर होते. तर दुसऱ्या बाजूला जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यावर देखील मोठं संकट आलं होतं. अनेक शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली होती, तर काही शेतकऱ्यांची पिकाबरोबर जमिन देखील वाहूनगेली होता. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान या पुरामुळं झाल्याचं पाहायला मिळालं.
काय आहेत शासकीय मदतीचे निकष?
आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास 5,400 ते Rs 16,000 पर्यंत मदत मिळणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 (पक्के) ते 4,000 (कच्चे) पर्यंत मदत दिली जाईल. झोपडीसाठी 8,000 आणि गोठ्यासाठी Rs 3,000 ची मदत मिळणार आहे.
किती मिळणार नुकसान भरपाई
जिरायत पिकांसाठी 8,500 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 प्रति हेक्टर (जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत) मदत मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास (केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना) 47,000 प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
















