Shaan on Majha Katta : सुरुवातीच्या काळात गायक होऊन एवढं काम करेल असं कधी वाटलं नव्हते असे मत सुरांचा जादूगार प्रसिद्ध पार्श्वगायक शान अर्थात शंतनु मुखर्जी (singer Shaan) यांनी व्यक्त केलं. सुरुवातीला दोन चार हजारांची नोकरी करेल असे वाटायचे. मी टीव्ही केबल विकण्याचेही काम केल्याचे शान यांनी सांगितले. मी गाण्याची सुरुवात मराठी गाण्यापासून केली. सुरुवातीला मी 'माझा बाप्पा' हे गाणं गायल्याचे शान यांनी सांगितले. शान यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. या गणेशोत्सवाच्या काळात एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रोज एका कलाकाराशी संवाद साधला जाणार आहे. 


माझ्या मनात काही आयडीया येत नाहीत. समोरचा काही बोलला की हो म्हणायचे एवढंचं काम मी करतो असे शान म्हणाले. समोरच्याने जर मला विचारले की तुम्ही हे काम कराल का तर मी काहीही विचार न करता काम करेल असे सांगतो असेही शान म्हणाले. या काळात अनेक गोष्टी केल्या, पण त्याचा मला फायदा झाल्याचे शान यांनी सांगितले. चाँद सी फारिश गाताना समोर मोठं आव्हान होतं, कारण समोर अमिर खान होता. चाँद सी फारिश या गाण्याला फिल्म फेअर अॅवार्ड मिळाला त्यानंतर गायक म्हणून एक टप्पा पार केल्याचा आनंद झाला. पुढे मी काम करत राहिलो, पढे आणखी खुप काही करायचे असल्याचे शान यांनी सांगितले. 


गाण्याची सुरुवात मराठी गाण्यापासून केली 


सुरुवातीच्या काळात मी बांद्रा आणि मुंबईच्या बाहेरचा विचार करत नव्हतो. मात्र, नंतरच्या काळात श्वेता शेट्टींच्या अल्बमध्ये दोन गाणी केली, त्यानंतर हळूहळू हिंदी पॉप गाणी सुरु केली. त्यानंतर 2017 साली मी स्वत: चा गाण्यांचा चॅनेल सुरु केल्याची माहिती शान यांनी दिली. काही गाणी आपण गाऊ शकत नाही, अशी गाणी गाण्यासाठी मी स्वत:चा चॅनेल सुरु केल्याचे शान म्हणाले. जे मला गाणे गाण्याची संधी देत होते, त्यांच्या अंदाजात मी गाणी म्हणण्याचा प्रयत्न करत होतो असे शान म्हणाले. मी गाण्याची सुरुवात मराठी गाण्यापासून केली होती.  सुरुवातीला मी माझा बाप्पा हे गाणं गायल्याचे शान यांनी सांगितले. नंतरच्या काळात गणेश वंदना, गणेश आरती, त्यानंतर बाप्पा मोरया हे गाणं गायल्याचे शान म्हणाले.   


गाणं शिकताना आई-वडील आणि आजोबांचा प्रभाव


गाणं शिकताना आई-वडील आणि आजोबांचा प्रभाव माझ्यावर पडल्याचे शान यांनी सांगितले. माझ्या वडिलांनी संगिताची खूप मोठी साधना केल्याचे शान म्हणाले. देशात अनेक प्रतिभावंत लोक आहेत, पण त्यांना यश मिळत नाही. यश आणि टॅलेंट यात फरक असल्याचे शान यांनी सांगितले. 


शान यांची आवडती मराठी गाणी कोणती?


दरम्यान, शान यांनी माझा कट्ट्यावर त्यांच्या आवडत्या मराठी गाण्यांचा देखील उल्लेख केला. यावेळी त्यांनी आश्विनी येणा...., हिल हिल पोरी हिल, ढगाला लागली कळ, दिलनची नागीन निघाली नागोबा डुलायला लागला ही गाणी मला आवडत असल्याचे शान म्हणाले. यावेळी शान यांनी कट्ट्यावर गाण्यांची काही ओळी गाऊन दाखवल्या.


  महत्त्वाच्या बातम्या:


Amar Singh Chamkila Teaser : पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर; दिलजीत दोसांझ आणि परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत