Fake currency In Maharashtra: नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू; थेट मुख्यमंत्र्यांचीच लेखी उत्तरात कबुली!
Fake currency notes are rampant in the maharashtra: 2020 पासून आतापर्यंत तब्बल 273 गुन्हे हे बनावट नोटांसंदर्भात दाखल झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई करताना 566 जणांना अटक केली आहे.

Fake currency notes are rampant in the maharashtra: नोटबंदीनंतरही राज्यात बनावट नोटांचा उच्छाद सुरु असल्याचे समोर आलं आहे. पुणे आणि भिवंडी नोटा छापण्याचे केंद्रबिंदू झाले असल्याची लेखी उत्तरामध्ये कबुली आज (16 जुलै) विधानसभेमध्ये मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरामध्ये दिली. या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी माहिती देताना राज्यात पुण्यात आणि भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे राज्यांमध्ये बनावट नोटांचे जाळ रोखण्याचे आव्हान असणार आहे.
राज्यामध्ये बनावट नोटा निर्मिती
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुणे आणि भिवंडीमध्ये बनावट नोटा छापण्याचे केंद्रबिंदू झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये बनावट नोटा निर्मिती होत असल्याची बाब सरकारकडून कबूल करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. इतकेच नव्हे 2020 पासून आतापर्यंत तब्बल 273 गुन्हे हे बनावट नोटांसंदर्भात दाखल झाले आहेत. यामध्ये पोलिसांनी कारवाई करताना 566 जणांना अटक केली आहे. हे गुन्हे व पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि भिवंडी या ठिकाणी दाखल झाले आहेत. दरम्यान, आतापर्यंतच्या कारवाईमध्ये पोलिसांकडून एक कोटी चाळीस लाख किमतीच्या बनावट नोटांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा असल्याचा स्पष्ट झालं आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पोलिसांनी एक कोटी चाळीस लाखांच्या बनावट नोटा पकडल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या

























