ओएनजीसीतला नांदेडचा इंजिनिअर 15 दिवसांपासून बेपत्ता
एबीपी माझा वेब टीम | 03 Nov 2016 11:34 AM (IST)
नांदेड : मुंबईजवळच्या ओएनजीसीतला 25 वर्षीय इंजिनिअर तरुण गेल्या 15 दिवसांपासून बेपत्ता आहे. मूळ नांदेडच्या असलेल्या शिवकुमार लष्करेचा थांगपत्ता लागलेला नाही. दिवाळीत घरी येतो असं सांगणारा शिवकुमार 15 दिवसांपूर्वी अचानक भर समुद्रातील ओएनजीसीच्या रिगवरुन बेपत्ता झाला. ओएनजीसीतर्फे पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला, ओएनजीसीनं शोध घेतला, पोलीस दलात फौजदार असलेल्या शिवकुमारच्या वडिलांनीही त्याचा शोध घेतला, मात्र शिवकुमार सापडलेला नाही. अतिशय संवेदनशील परिसर असलेल्या या भागात अपहरण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे शिवकुमार नेमका कुठे गेला, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.