Kolhapur : 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) या चित्रपटात नावे बदलल्याने कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यातील नेसरीत (Nesari) तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गावकऱ्यांना सोनेरी इतिहासाची मोडतोड नको ती नावे घुसवल्याचा आरोप करत महेश मांजरेकरांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. नेसरीकरांनी वीरांची नावे बदलल्याचा आरोप करत एकत्र येत आंदोलन केले व इतिहासाची मोडतोड करणाऱ्या कृत्याचा  निषेध केला. नेसरीमध्येच गुर्जर आणि खानांमध्ये युद्ध झाले होते. मात्र, चित्रपटात नावे बदलण्यात आल्याने नेसरीकरांचा संताप अनावर झाला आहे. प्रतापराव गुजर यांनी नेसरीच्या खिंडीतच सात मावळ्यांसह पराक्रम गाजवला होता. (Vedat Marathe Veer Daudale Saat)


चित्रपटातील काल्पनिक नावांना गावकऱ्यांनी एकत्र येत विरोध केला. धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची आणि चित्रपटात दाखवलेल्या मावळ्यांची नावे वेगळी असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.  ज्या नेसरीच्या भूमीत सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी सहा मावळ्यांसह बलिदान दिले, त्यांनी या मातीत रक्त सांडले, त्या नेसरीत मांजरेकरांनी यावे आणि खरा इतिहास समजून घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. 


'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं चित्रपटात काही पण दाखवायचं?'



  • 'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं चित्रपटात काही पण दाखवायचं?' अस म्हणत संभाजीराजे (Sambhajiraje on Vedat Marathe Veer Daudale Saat) यांनीही विरोध केला आहे. "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटातील कलाकांचा एक फोटो दाखवत संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'हे मावळ्यांचे पोषाख पाहा. हे काय मावळे आहेत का?' मी दौऱ्यामध्ये होतो त्यामुळे मी अजून हा चित्रपट बघितले नाहीत पण माझी भूमिका स्पष्ट आहे. चांगले चित्रपट केले तर मी स्वतः दिग्दर्शक यांना कौतुकाची थाप देईल. पण इतिहासाची मोड तोड केली तर गाठ माझ्याशी आहे.'

  • ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे.

  • ऐतिहासिक चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड केली जात आहे तसेच या चित्रपटांमध्ये इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे, असा आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी काही ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मात्यांवर केला आहे.

  • हर हर महादेव आणि वेडात दौडले सात या दोन चित्रपटांवर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्षेप घेतला आहे.

  • 'हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे.

  • हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवायचं?

  • सिनेमॅटिक लिबर्टी असली तरी इतिहासाचा गाभा सोडून कसे काय हे लोक चित्रपटाची निर्मिती करत आहेत?' असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

  • 'चित्रपटांच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना मी सांगू इच्छितो, जर अशा चित्रपटांची निर्मिती केली तर गाठ माझ्याशी आहे.

  • आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं आपण वाचत नाही, ही आपली देखील चूक आहे. त्यामुळे हे लोक इतिहासाची मोड तोड करुन आपल्या समोर मांडतात.

  • माझी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे की, सेन्सॉर बोर्डात ऐतिहासिक चित्रपटांसाठी समिती असावी ' अशी मागणी यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या