मुंबई : आजपासून महावितरणच्या (Mahavitran) वीज दरात वाढ (Mahavitran Electricity Rate) करण्यात आली आहे. वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून आजपासून नवे दर लागू (Mahavitran Electricity New Rate) करण्यात येणार आहेत. त्यामुळे महावितरणच्या (Mahavitran) ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरु होत असून 1 एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत.
एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी वीज दरवाढीचा झटका
महावितरणने ग्राहकांना वीज दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढत असताना महावितरणच्या वीजग्राहकांना 1 एप्रिलपासून वीजदरवाढीचा शॉक बसणार आहे. परिणामी वीजबिलात किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे.
वीज दरवाढीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
विजेच्या दरवाढीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) वीज दरात वाढ केली आहे. त्याचा बोजा लहान ग्राहकांवर पडू नये अशा पद्धतीने त्याची नियोजन करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :