अहमदनगर : नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. दोन दिवसांपासून पारनेरजवळील काही गावांमध्ये विजपुरवठा बंद आहे. त्यामुळे चारशे ते पाचशे नागरिकांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केलं आहे.

अहमदनगरमधील संगमनेरच्या साकूर गावच्या नागरिकांनी हा वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळं देसवडे, मांडवा, काळेवाडी, टेकडवाडी या गावातील वीज पुरवठा गेल्या पाच दिवसांपासून बंद आहे. वीजे अभावी शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसंच विहिरीत पाणी असूनही विजेअभावी पीकं, फळबागा उन्हानं जळू लागल्या आहेत, विद्यार्थ्यांनाही विजेचा फटका बसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
साकूर गावातील पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर दबाब टाकून वीजपुरवठा खंडित केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सोडणार नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.