Deputy Speaker of the Legislative Assembly Election : विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम (Deputy Speaker of the Legislative Assembly Election) जाहीर झाला आहे. मंगळवारपर्यंत (25 मार्च 2025) अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर 26 तारखेला उपाध्यक्षाची निवड होणार आहे. महायुतीत नेमकं कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला विधानसभा उपाध्यक्षपद मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. तर महाविकास आघाडीनं चांगलीच मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं आहे. महायुतीनं राज्यात सत्ता स्थापने केली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळं विधासभा अध्यक्षपदी भाजप नेत्याची निवड करण्यात आली. पुन्हा राहुल नार्वेकर यांनाचं विधासभा अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाला जाणार याची चर्चा सुरु आहे.
26 मार्च 2025 पर्यंत विधीमंडळाचे अधिवेशन चालणार
सध्या विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन 3 मार्चला सुरु झाले आहे. 26 मार्च 2025 पर्यंत म्हणजे आणखी तीन दिवस हे अधिवेशन चालणार आहे. दरम्यान, विधानसभा आणि विधानपरिषदेत या दोन्ही सभागृहात 10 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीअर्थसंकल्प मांडला. सध्या विविध मुद्यांवरुन विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर हिंसाचार प्रकरण असेल, औरंगजेब कबरीचा मुद्दा असेल, त्याचबोरबर दिशा सालियन प्रकरण असेल तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धेरवर धरण्याचं काम केलं आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार
दरम्यान, येत्या 26 मार्च पर्यंत विधीमंडळाचे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. दरम्यान, विधानसभेचा उपाध्यक्ष कोणत्या पक्षाचा होणार याची चर्चा देखील सध्या सुरु आहे. भाजपने विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड केली आहे. त्यामुळं आता भाजप विधानसभा उपाध्यक्ष पदाची संधी ही एका शिंदे यांच्या शिवसेनेला देणार की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणार, हा देखील सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: