जालन्यात क्रूझरमध्ये 5 लाख 96 हजार रुपयांची रोकड
एबीपी माझा वेब टीम | 15 Feb 2017 09:02 AM (IST)
जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका क्रूझर गाडीमध्ये 5 लाख 96 हजाराची रोकड आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्या. निवडणूक भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान ही रोकड आढळून आली. विशेष म्हणजे यात नळणी गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार लक्ष्मण ठोंबरे आणि गोदावरी वराडे यांच्या नावाच्या पोल चिट देखील आढळून आल्या. या गाडीमध्ये तपासणी दरम्यान पोलिसांना दारूच्या 7 बाटल्या देखील आढळल्या. त्यामुळे प्रकरणाचं गांभिर्य वाढलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी गाडी चालकाला अटक केलं असून, त्याच्यासह नळणी गटातील राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांविरोधात भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.