Ramdas Kadam on Eknath Shinde : महायुतीमध्ये कोणताही वाद नाही, त्यांना लोकांमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करायची आहे. माझं तर मत आहे एकनाथ शिंदे यांनी सामना विरोधात आणि संजय राऊत विरोधात कोर्टात गेलं पाहिजे, सातत्याने माझी बदनामी करता येत म्हणून न्यायालयात दाद मागितली पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भाजप शिवसेनेमध्ये मिठाचा खडा टाकायचा आहे, शिंदेंना एकाकी पाडायचं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याला कोणी विश्वास ठेवत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

वर्षा बंगला काळी जादूवर काय म्हणाले?

रामदास कदम म्हणाले की, आमच्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी येणार नाहीत. त्यांचे तिथं दोन बंगले आहेत. वर्षा बंगल्यावर कार्यालय करतील अशी माझी माहिती आहे, पण जणू काही आपणास शिंदे यानी काळी जादू झाली आहे अशा बातम्या संजय राऊत पसरवत आहेत. शिंदे यांच्या भाषणात जाहीरपणे म्हणाले होते की, वर्षा बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळी टोपलीवर लिंबू मिळाले. म्हणून काळ्या जादूचे  बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरेच आहेत, अशी टीका रामदास कदम यांनी केली. 

संजय शिरसाटांचे मत वैयक्तिक

कदम यांनी सांगितले की, संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावरून मत व्यक्त केले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. कोणत्याही शिवसैनिकाची, आमदारांची, खासदारांचे असं मत नसल्याचे ते म्हणाले. आज जे आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांनी निवडून आणले आहेत, त्यासाठी प्रचंड असा निधी मतदारसंघात दिला आहे म्हणून आमदार निवडून आले आहेत. उद्धव साहेब ठाकरेंकडे असते, तर पाच दहा आमदार देखील निवडून आले नसते, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे स्वतःला हुकुमशाह समजतात, शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या विचारांना काळीमा फासली. बेईमानी करून विचारांना हरताळ फासून ते काँग्रेस सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. म्हणून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दोन्ही शिवसेना कदाचित एकत्र होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे ते म्हणाले. शिरसाट यांना का प्रेम उफाळून आलं याचे उत्तर तेच देतील त्यांचं ते मत वैयक्तिक आहे पक्षाचं नाही, असेही त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या