एक्स्प्लोर

Eknath Shinde : मराठी भाषेबाबत तडजोड करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही : एकनाथ शिंदे

Shiv Sena Meeting : नेत्यांनी, मंत्र्यांनी शक्य तितकं कमी बोलावं आणि जास्त काम करावं. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही, मराठीची गळचेपी सहन करणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करायचं ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे असंही शिंदे म्हणाले. मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना नेहमी आग्रही असल्याचा ठराव त्यामध्ये संमत करण्यात आला. 

एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी शिंदेंनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. आपल्यात शिवसैनिक हे पद सर्वात मोठं आहे हे लक्षात ठेवा. कार्यकर्ता हा नेता तयार करतो, पक्ष घडवतो . त्यामुळे कार्यकर्त्याला जपले पाहिजे असं शिंदे म्हणाले. 

नेता, आमदार, मंत्री झालो ही हवा डोक्यात जाऊ देऊ नका, कायम कार्यकर्ता म्हणूनच काम करा असा सल्ला एकनाथ शिंदे यांनी दिला.  एकटा माणूस मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही. कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो असंही ते म्हणाले. 

मंत्र्यांना शिंदेंच्या कानपिचक्या

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले की, आपण कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं. विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एस्पोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका. केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे.

शिवसेनेत निवडणुका होणार

एकनाथ शिंदे म्हणाले की, "शाखाप्रमुखापासून तर मुख्य नेत्यापर्यंत सर्वांनाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. पक्षाचे सक्रिय सदस्य हेच मतदार असतील. डिजिटल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने आणि प्रत्यक्ष मतदान पद्धतीने अशा 7 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. कुठेही लपवाछपवी नाही, किंवा कुणाचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न होणार नाही. ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. संपूर्ण पारदर्शक पद्धतीने, निःपक्षपाती पद्धतीने निवडणुका होतील. मी मुख्य नेता असलो तरी आज निवडणुकीला रीतसर सामोरा जाणार. शाखाप्रमुख असो किंवा मुख्यनेता लोकशाहीत सगळेच समान आहे."

एकनाथ शिंदे म्हणाले की, "निवडणुकांसाठी सज्ज व्हा, एकदिलाने काम करायचंय, निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार हवा. उमेदवार चुकला की संपलं. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा. नोंदणी करताना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी उद्दिष्ट ठरवून नोंदणी करा. शाखेचं जाळं बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी घट्ट केलं आहे. शाखा ही लोकांना आधार वाटते. कंटेनर शाखेचा कॉन्सेप्ट ठिकठिकाणी राबवा. 'घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा' ही झालीच पाहिजे."

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीशांना का काढलं? 2024 च्या निवडणुकीपूर्वी आयुक्तांना पूर्ण कायदेशीर संरक्षण का दिलं? CCTV फुटेज नष्ट करण्याची इतकी घाई का? राहुल गांधींचे तीन सवाल
Pune Accident News: भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
भरधाव PMPL बसने दोघींना उडवलं; 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील घटना CCTV मध्ये कैद, नेमकं काय घडलं?
Pune Sahyadri Hospital: शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा ऑपरेशनमध्ये मृत्यू, पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात तोडफोड
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
तुकाराम मुंढे घाबरला, त्याच्या सांगण्यावरून समर्थकांच्या जीवे मारण्याचा धमक्या; भाजप आमदार कृष्णा खोपडेंचा गंभीर आरोप
Pune Mundhwa Land Case : मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
मुंढव्यातील जमिनीवर 2018 पासून अजित पवार पक्षाची नजर; मोठा प्लेअर राष्ट्रवादीचा उपमहापौर, दमानियांचा मोठा दावा
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
शॉकिंग! भर रात्री धरणाच्या दिशेने गेले, विशीतल्या तरुण तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, सिंधुदुर्ग हादरले
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची विधानभवनात तुंबळ हाणामारी; ऋषिकेश टकले, नितीन देशमुखवर जेलच्या शिक्षेची शिफारस!
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
धुरंधरमध्ये रहमान डकैत साकारत अक्षय खन्नाने भलताच भाव खाल्ला, पण खऱ्या आयुष्यात ‘नो-गो झोन’ केलेल्या कराचीच्या लियारीत रहमानचा शेवट कसा झाला? एन्काऊंटर करणारा एसपी चौधरी सुद्धा का वादात अडकला?
Embed widget