Eknath Shinde : आमदार कोण आहे? कुठल्या पक्षाचा आहे? यापेक्षा मतदारांना काय पाहिजे ते देण्याचे काम प्रकल्पासाठी विकासासाठी आम्ही केल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केले. आता सुद्धा इथे बसल्या बसल्या काही लोकांनी माझ्या सह्या घेतल्या, त्यांना माहिती आहे हुशार आहेत एकनाथ शिंदे पेन  काढतो सह्या करतो आता पेनाची शाई कधी संपते ते कळत नाही म्हणून दोन दोन पेन ठेवलेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते जालन्यान शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते. आम्ही कशावरच क्लेम करणार नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे शिंदे म्हणाले.

Continues below advertisement

मुख्यमंत्री होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात कधीही मुख्यमंत्री सहायता निधी दिला. पूर्वीच्या अडीच वर्षात अडीच कोटी मिळाला होता. मी मुख्यमंत्री असताना साडेचारशे कोटी रुपये मिळाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कितीतरी लोकांचे जीव वाचले, आम्ही दिलेला शब्द पाळणारे लाडके बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. 

शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप झालं

शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप झालं. शिवसेनेचा पवित्र धनुष्यबाण गहाण ठेवला गेला असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. म्हणून 2022 ला आम्ही उठाव केला जगातल्या अनेक देशांनी हा उठाव पाहिला आणि सरकार बदलल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं आहे. तेव्हा लोक म्हणाले तेंव्हा चाळीस-पन्नास लोक गेले त्यातला एकही निवडून येऊ देणार नाही. मी सांगितलं ते मी केलं माझ्याबरोबर जे लोक होते त्यांना निवडून नाही आणलं तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून शेती करायला गावी जिंकून जाईल आता कोणी जायला पाहिजे?, 40 ते 60 आल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. .

Continues below advertisement

आम्ही कशावरच क्लेम करणार नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती 

भगवा झेंडा कुणाचा आहे हा प्रभू रामचंद्राचा आ,हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, बाळासाहेबांचा आहे तर डाग लावण्याचे काम त्याला बदनाम करायचं काम लोक करत आहेत. आम्ही कशावरच क्लेम करणार नाही बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. आपल्या पक्षात कोणी मालक नाही लवकर नाही आपण सर्वजण सहकारी आहोत.आपण तिकडे गेलो होतो रामगिरी महाराज यांच्याकडे, काही लोक म्हणले तिकडे जाऊ नका म्हटलं काय बंधन आहे का? महाराष्ट्र संतांची भूमी आहे या राज्यात संतांच्या केसाला देखील धक्का लागू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे संतांची भूमी आहे शुरांची भूमी आहे. आपला अजेंडा खुर्ची नाही राज्याचा विकास आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Eknath Shinde : देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला का जातात? उत्तर देताना म्हणाले....