Eknath shinde And Devendra fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने मागील काही दिवसांमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार नसतानाही दोन जणांच्या मंत्रिमंडळाने घेतेले निर्णय अवैध असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले होते. त्यासाठी त्यांनी भारतीय घटनेचा दाखलाही दिला होता. त्याशिवाय अन्य एका ट्विटमध्ये 12 कोटींच्या महाराष्ट्रात फक्त दोन मंत्री घेत आहे. संविधान कुठेय? मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत महाराष्ट्रात राजष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी संजय राऊतांनी केली होती. राऊतांच्या या ट्विटला भाजपमधून प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत संजय राऊतांना जशास तसे उत्तर दिलेय. 

Continues below advertisement


राज्यसभा लोकसभामध्ये निवडून आलेल्या सदस्यांनी माहिती घेतल्याशिवाय अश्या प्रकारे बोलणे योग्य नाही. चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जातेय, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. 


 तुम्हाला कायदा, संविधान काही कळते का?, काय म्हणाले शेलार?
 महाविकास आघाडीत 7 जणांच्या मंत्रिमंडळाने 32 दिवस निर्णय घेतले आणि आता म्हणे संविधानाचे अनुच्छेद 164 (1A) सांगते 12 सदस्यांचे मंत्रिमंडळ हवे!  अहो तुम्हाला कायदा, संविधान काही तरी कळते का? संविधानातील हे कलम मंत्रिमंडळाचा आकार किती असावा, याच्याशी संबंधित आहे. विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येपेक्षा 15% अधिक मंत्री नको,पण असे करताना किमान 12 असा त्याचा अर्थ आहे. उदा. गोवा अशा लहान राज्यांसाठी ही तरतूद. तेथे नियमाने केवळ 6 मंत्री होऊ शकतात. पण या नियमाने 12 आहेत. विस्ताराच्या कालावधीचा या संविधानाच्या कलमात कुठेही उल्लेख नाही. अज्ञान आणि विपर्यासाचा काळ संपलाना मा. खासदार संजय राऊतजी.


संजय राऊतांचं ट्वीट -
भारतीय राज्यघटनेच्या कलम 164  1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही.  गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही.  राज्यपाल, हे काय सुरू आहे ?