Eknath Khadse : नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर आता त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांची भाजपवर मोठी टीका केली आहे. सुधाकर बडगुजर यांचे दाऊदचा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबतचे डान्सचे फोटो प्रकाशित झाले होते. त्यामुळं भाजपने मोठा विरोध केला होता. पण आता सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजप आता पवित्र झाल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. सुधाकर बडगुजर आणि घोलप यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून खडसेंनी स्वतःच्या भाजप पक्षप्रवेशा संदर्भात वक्तव्य केलं आहे. सुधाकर बडगुजर यांचे दाऊद चा जो हस्तक आहे सलीम कुत्ता त्याच्यासोबत चे डान्स चे फोटो प्रकाशित झाले होते. त्यावेळी भाजपने मोठा विरोध केला होता. मात्र, आता सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी ही पवित्र झाली आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊंना प्रवेश दिला गेला नाही. तेव्हा भाजप अपवित्र होत होता असेही एकनाथ खडसे म्हणाले.
कोण आहेत सुधाकर बडगुजर?
सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला 2007 मध्ये सुरुवात झाली. ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2008 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2009 ते 2012 काळात ते नाशिक महापालिकेचे सभागृहनेते होते. तसेच 2012 ते 2015 या काळात बडगुजर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनेक गुन्हेगारी घटनांमध्येही बडगुजर यांच्यावर आरोप आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे सुधाकर बडगुजर म्हणाले.