एक्स्प्लोर

जळगावच्या सावदामध्ये एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? 

जळगाव जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना अर्वाच्या शब्दात अरेरावी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे

एकनाथ खडसे यांच्यावर कलम 296 नुसार सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर कलम 296 नुसार सावदा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मात्र त्यावेळी माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाल्यानं पोलीस निरीक्षकाची माफी मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 

भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

दरम्यान, कालच शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. भोसरी जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना मुंबई उच्च न्यायालयाने (high court) हा दिलासा दिला असून सत्र न्यायालयात सुरू असलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली. त्यामुळे, याप्रकरणी खडसे कुटुंबियांविरोधातील 13 तारखेला होणारी आरोप निश्चिती टळली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 2018 साली झालेल्या सुधारणेला मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान देण्यात आल्याची नोंद घेत उच्च न्यायालयाकडून खडसेंविरोधातील सत्र न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेवर तूर्तास स्थगिती देण्यात आली. 24 तारखेपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर तातडीने प्रकरण मेंशन करुन घेण्याचे निर्देश न्या.अश्विन भोबे यांनी दिले आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 13 (1 ड) अंतर्गत खडसेंवर भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कायद्यात झालेल्या सुधारणेनंतर या कलमात बदल झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सुधीर मुनगंटीवारांचा भाजपमध्ये 'एकनाथ खडसे' होणार का? पक्ष नेतृत्वाविरोधात आक्रमक भूमिकेनंतर अनेक प्रश्न

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Buffalo Attack : कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
कुत्रा चावल्याने म्हैस चिडली, रस्त्यावरुन जाणाऱ्या आजोबांना जोरात धडक देऊन आपटलं, नागपूरमधील जखमी वृद्धाचा मृत्यू
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
India LPG Crisis : मोठी बातमी! घरगुती गॅस पुरवठ्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; तर नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांसाठी तीन कार्यकारी संचालकांची समिती गठीत
मोठी बातमी! घरगुती गॅस पुरवठ्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; तर नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांसाठी तीन कार्यकारी संचालकांची समिती गठीत
Israel-Iran War Affect India: युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ, उत्पादन निम्म घटलं; साडे सात हजार कंपन्यांना फटका?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Maharashtra Live blog updates: नागपूरमध्ये म्हशीच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचे निधन
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Embed widget