पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय, मदत करण्याचं मंत्री पाटील यांचं आवाहन
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा देत, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळं पूर (Flood) आले आहेत. या पुरामुळं शेतकऱ्यांचं, घरांचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळं पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा देत, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. आज मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देणे शक्य आहे : मंत्री दादाजी भुसे
आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देणे शक्य आहे आणि याबाबत प्रशासनाने प्रक्रिया गतिमान करावी असे निर्देश माननीय शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आजच्या बैठकीत दिले. आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयीन दालनात माजी सैनिकांमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्छिंद्र प्रताप सिंह , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे राहूल रेखावार, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव गणेश पवार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव तुषार महाजन,राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसचिव गोविंद कांबळे , शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित, SIT चौकशी होणार; 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा आरोप
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI



















