मुंबई : इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचे (Iran Israel War) पडसाद आता थेट भारतीय स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, अवघ्या काही दिवसांतच प्रति किलो १३ ते १५ रुपयांनी दर वधारले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांना या महागाईचा मोठा फटका बसला आहे. इराण इस्रायल युद्धामुळे (Iran Israel War) तेलाचे दर वाढले सोबतच तेलात जे पदार्थ बनविले जातात आणि विकले जातात त्याचे ही दर वाढले आहे. हमालीचे ही दर वाढले आहेत. तेलाच्या प्रति लिटर मागे १० रुपयांनी वाढ झालेली आहे तर डालडाचे ही भाव वाढले आहे. पूजेसाठी वापरले जाणारे सुंगांधी तेल ही महाग झाले असल्याची बाब किराणा दुकान विक्रेत्यांनी मांडली आहे.
किती रूपयांनी महागलं तेल
पाम तेल १२० होते १३५ झाले सूर्यफूल १४० चे १५५ रुपये लिटर झाले शेंगदाणा तेल १८० चे १९० आहे. फ्राई नूडल्स सेव यांचे दरही किलो च्या मागे ५ रुपयांनी वाढले डालडाचे ही भाव आहेत १० रुपयांनी वाढले आहे
खाद्यतेलाचा भडका
बाजारपेठांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.
सूर्यफूल तेल: २८ फेब्रुवारीपर्यंत १६० रुपयांना मिळणारे एक किलो सूर्यफूल तेल आता १७३ रुपयांच्या पार गेले आहे.
सोयाबीन तेल: सूर्यफूल तेलाच्या तुटवड्यामुळे सोयाबीन तेलाची मागणी अचानक वाढली असून त्याचेही दर कडाडले आहेत.
मार्केट यार्डात १५ किलोच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. बाहेरील राज्यांतून होणारी आवक घटल्याने घाऊक बाजारात १० ते १२ टक्के दरवाढ दिसून येत आहे.
पाडवा होणार महाग
केवळ तेलच नव्हे, तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्याने यंदाचा गुढीपाडवा महागडा ठरण्याची चिन्हे आहेत.
दरवाढीमागील नेमकी कारणे काय?
१. जागतिक तणाव: इराण-इस्रायल युद्धामुळे खनिज तेलाच्या (Crude Oil) किमती वाढल्या असून लॉजिस्टिक आणि वाहतूक खर्च वाढला आहे.२. आयातीत अडथळे: बंदरांवरील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने खाद्यतेलाची आयात मंदावली आहे, परिणामी किरकोळ बाजारात साठा कमी पडत आहे.३. सणासुदीची मागणी: गुढीपाडवा जवळ आल्याने खाद्यतेलाच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे किमतींवर अधिक दबाव निर्माण झाला आहे.
