Ebola Virus In India Nagpur : जगभरात इबोला (Ebola Virus) आजाराचंनवंसंकटउभंराहिलेआहे. याआजाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इबोला रोगावरील तयारीच्या अनुषंगानेआरोग्ययंत्रणासतर्कझालीआहे. नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी आफ्रिकेतील काही भागांमध्ये वाढत्याउपाययोजनांचा आढावा घेतला. आजपर्यंत भारतात बुंडीबुग्यो इबोला रोगाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती यावेळी जे. पी. नड्डा यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला उद्रेकाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेआहे. तसेच त्या दृष्टीने सर्वयंत्रणा सतर्क झाले असून विशेष खबरदारी घेताना दिसत आहे. (Ebola Virus In India) अशातच इबोला आजाराच्या (Ebola Virus) पार्श्वभूमीवर देशातील विमानतळावर (Pune Airport) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आता तपासणी केली जात आहे. दरम्यान, युगांडावरून नागपुरात (Nagpur) आलेल्या नागरिकाला 21 दिवस होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे.
Nagpur News : युगांडा प्रवास लक्षात घेता खबरदारी म्हणून पुढील 21 दिवस होम आयसोलेशन
इबोलाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध विमानतळांसह नागपूर विमानतळ ही हायअलर्टवर आहे. अशातच युगांडावरून नागपुरात आलेल्या एका 47 वर्षीय प्रवाशाला मनपाच्या आरोग्य विभागाने होम इसोलेशनमध्ये ठेवले आहे. त्या व्यक्तीला सध्या इबोला संसर्गाची कोणतीही लक्षणे नाही. मात्र, त्याचा युगांडा प्रवास लक्षात घेता खबरदारी म्हणून पुढील 21 दिवस दररोज मनपा आरोग्य विभागाकडून तपासणी केली जाईल. लक्षणे आढळल्यास शासकीय वैद्यकीय रुग्णालयमध्ये दाखल करण्याची तयारी ही मनपाने ठेवली आहे.
आफ्रिकेत काही देशांमध्ये इबोलाच्या ‘बुन्डिबुग्यो’ स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशातीलसर्वशहरात खबरदारी घेण्यात आली आहे. WHO कडून जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारकडून ही ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. त्यात इबोलाग्रस्त देशांत प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आलं आहे.
भारतात विमानतळांवर हाय अलर्ट जारी- (Ebola Virus In India)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष दक्षता घेण्यात येत असून, प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग (Thermal Screening) व तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारने नागरिकांना काँगो , युगांडा (Uganda) आणि दक्षिण सुदान (South Sudan) या देशांमध्ये विनाकारण प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. भारतात सध्यातरी एकही रुग्ण आढळलेला नाही, तरीही विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
इबोलाची मुख्य लक्षणे कोणती? (What are the main symptoms of Ebola?)
- अचानक तीव्र ताप
- प्रचंड अशक्तपणा
- तीव्र डोकेदुखी
- स्नायू दुखणे
- उलट्या, जुलाब
- डोळे लाल होणे
- भूक न लागणे
इतर महत्वाच्या बातम्या
