Earthquake Parbhani and Nanded: राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परभणी, (Parbhani) नांदेड (Nanded) हिंगोली (Hingoli), वाशिमसहयवतमाळमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (earthquake) बसल्याचीमाहितीआहे. तरकाहीठिकाणीभूकंपाचीतीव्रताजास्तअसल्यानेघरांच्याभितींनातडेगेलेअसूनघरावरील पत्रे हलल्याचीहीघटनाघडलीआहे. अचानक सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचवातावरणपसरलंअसूनअंदाजे 8 वाजून 46 मिनिटांनी हाधक्काजाणवल्याचीप्राथमिकमाहितीआहे.
Hingoli Earthquake : घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडले, अनेकांच्या घराला तडे
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी आठ वाजून 47 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. हिंगोली जिल्ह्यांमध्ये दरवेळेस भूकंपाचे धक्के जाणवत असतात. मात्र यावेळेसचा भूकंपाचा धक्का हा मोठ्या प्रमाणात असल्याचं नागरिक सांगत आहेत. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेक गावातील घरामध्ये ठेवलेली भांडी आणि वस्तू जमिनीवर कोसळून पडले आहेत. तर अनेकांच्या घराला तडे गेल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा भूकंपाचा धक्का हिंगोली जिल्ह्यासह नांदेड, परभणी या जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात जाणवलेला आहे.
Earthquake News : 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद
हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण गावांना या भूकंपाच्या धक्के जाणवल्याची माहिती असून अद्याप पर्यंत कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र भूकंपानंतर भयभीत झालेले नागरिक तत्काळ घराच्या बाहेर आले होते. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. या भूकंपाचे अद्याप प्रशासन स्तरावर कोणतीही नोंद झाली नसली तरी प्रशासनाच्या वतीने या भूकंपाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. भूकंपाचे केंद्रबिंदू पांगरा शिंदे गाव भूकंपाची नोंद झाली असून 4.7 रिश्टर स्केलचा हा भूकंप झाला आहे.
Hingoli Earthquake : भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याचीमाहिती
दुसरीकडे, नांदेडमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेआहे. शहरातील सिडको, वजीराबाद, आनंद नगर, तरोडा सांगावी भागात हेधक्केप्रकर्षाने जाणवले आहेत. मिलेल्यामाहितीनुसार, 4.7 रिस्टर स्केलचा हा भूकंप असल्याचीमाहितीआहे. वसमत येथील पांगरा शिंदे येथे 10 किमी खोलीवर भुकंपाचे केंद्र असूनभूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असल्याचीमाहितीआहे. तरतिकडे, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेबाळपिंपरी भागात भूकंपाचे सौम्य धक्केजाणवलेआहे. 8 वाजून 45 मिनिटाने हाधक्का जाणवला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
