लातूर : लातूरच्या औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी, बेलकुंड, आशिव या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १२ वाजून २३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. भूकंपाच्या धक्क्याने जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी, भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं.