Dr. Pradeep Kurulkar : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असणारे DRDO चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradip Kurulkar) यांच्या तपासाची चर्चा थेट अधिवेशनात झाली. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्याची मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली आहे.
ते म्हणाले की, डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणाचा कोर्टात खटला सुरू आहे आणि यामधे फक्त एकच कलम लावण्यात आले आहे. हा व्यक्ती झारा नावाच्या एका महिला गुप्तहेरासोबत संपर्कात होता. आता माहिती समोर येतं आहे की हा व्यक्ती काही देश फिरला आहे. एका देशात दोघांनी एकत्र क्रिकेट मॅचदेखील पाहिली आहे. कुरुलकरांविरोधात विरोधात देशविरोधी कृती केली. तरीही त्यांच्यावर देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल करण्यात आला नाहीं. केवळ ऑफिशिएल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या व्यक्तीचा एका राजकीय पक्षाशी संबंधित एका संस्थेचा सदस्य आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत जयंत पाटलांनीदेखील याचा सखोल तपास करावा आणि कुरुलकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. चार्जशिट दाखल होताना या प्रकरणावर चर्चा होईल. हा विषय सभागृहात घेता येणार नाही. यावर चर्चा होणार नाही, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय.
काय आहे प्रकरण?
डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना एटीएसकडून अटक करण्यात आली होती. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला. डीआरडीओ ही सरकारी संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या वैज्ञानिकाने पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याने एकच खळबळ उडाली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) विशेष न्यायालयात कुरुलकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये सांगितल्याप्रमाणे, डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी महिला गुप्तचराला भारतीय क्षेपणास्त्र, ड्रोन आणि रोबोटिक्स संदर्भातील माहिती पुरवल्याचं समोर आलं आहे. त्याच्याकडे असलेले जोन मोबाईल. लपटॉप एटीएसने जप्त केले. त्यातून कुरुलकरांनी डेटा डिलीट केल्याचं समोर आलं होतं. त्यांच्यात आणि ढारा दास गुप्ता यांच्यात झालेलं खासगी संभाषणदेखील समोर आलंं होतं. कुरुलकर याच्याकडील असलेला मोबाईलचे "डेटा रिट्रीव्ह" करण्याचे काम सुरू आहे. गुजरात मधील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) तपासणीसाठी मोबाईल पाठवला आहे.
हेही वाचा-
Dr. Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकर तपासाला सहकार्य करत नाहीत; मोबाईलमधील डेटा डिलीट केला पण...