Bird Flu: राज्यभरात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर आले असून पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे .पशुविभागाकडून राज्यात बर्ड फ्लूचा हाय अलर्ट देण्यात आला आहे .बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्षी व प्राण्यांमधून संसर्गाने व्यक्तीलाही होऊ शकतो . H5 N 1, H7 N 9,या नव्याने आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरातही प्रवेश करतो .त्यामुळे काही रुग्णांना सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत पण नंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात . काय लक्षण आहेत बर्ड फ्लूची ?बर्ड फ्ल्यू चा प्रसार कसा होतो ? बर्ड फ्लू वर प्रतिबंधात्मक उपाय काय ? पाहूया . (Bird Flu Maharashtra)

बर्ड फ्लूची लक्षणे कोणती ?

  • सतत खोकला आणि उच्च ताप
  • डोकेदुखी
  • सतत नाक वाहणे
  • पचनाच्या तक्रारी (उलट्या , मळमळ , जंत होणे )
  • घशात सूज येणे 
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • डोळे दुखणे
  • अतिशय थकवा जाणवणे,अशा प्रकारची लक्षणे सुरुवातीला जाणवतात .

बर्ड फ्लू चा प्रसार कसा होतो ?

बर्ड फ्ल्यू चा प्रसार किंवा संसर्ग प्रामुख्याने कोंबड्या टर्की मोर किंवा इतर पक्षांमुळे होतो . H5 N1 , H 5N 9 , H 5N8 या नवीन आढळलेल्या विषाणूमुळे डोळे कान आणि तोंडाद्वारे हा विषाणू शरीरात प्रवेश करतो .

बर्ड फ्लू होऊ नये यासाठी काय कराल?

  • बर्ड फ्लू नये संक्रमित होऊ शकतात अशा पक्षांपासून त्यांच्याविष्टेशी किंवा पिसांशी संपर्क टाळा .
  • जंगली तसेच पाळीव पक्षांपासून दूर राहा
  • बर्ड फ्लू ची लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहणे टाळा .

बर्ड फ्ल्यू प्रतिबंधासाठी प्रशासन सतर्क

त्यामुळे तालुकास्तरावर बर्ड फ्ल्यू प्रतिबंधासाठी समित्या गठित करण्यात आल्यात .एकूणच प्रशासन सतर्क झाल्या असून बर्ड फ्ल्यूचा प्रसार रोखण्यासाठी बहुतांश ठिकाणी परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात आहे . वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा मृत्यू झालाय .राज्यात अनेक जिल्ह्यात कोंबड्या टर्की मोर तसेच कावळे मरून पडण्याचं प्रमाण वाढलंय .

कोरोनानंतर भारातात आलेल्या बर्ड फ्लूने केरळ राजस्थान मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात हाहाकार दिसून आला. त्याच दरम्यान, अनेक ठिकाणी स्थलांतर करून येणाऱ्या कावळ्यासह इतर पक्षांच्या मृत्यूंमध्ये झालेल्या वाढीने चिंतेचे वातावरण पसरले होते. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने डोके वर काढलंय.

बर्ड फ्लू म्हणजे काय? कितपत धोकादायक?

बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएन्झा म्हणूनही ओळखले जाते. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो केवळ पक्ष्यांनाच संक्रमित करत नाही तर हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. यातील बहुतेक विषाणू पक्ष्यांपर्यंतच मर्यादित असले तरी पक्ष्य्यांसाठी हा रोग प्राणघातक आहे. या रोगाचे विविध प्रकार आहेत.H5N1 मध्ये दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता आहे. H5N1 ची लागण झालेले पक्षी 10 दिवसांपर्यंत विष्ठा आणि लाळेत विषाणूच्या रूपात सोडत राहतात. दूषित क्षेत्राच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. दरम्यान, सतत स्थलांतर करणाऱ्या पक्षांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याने याचा धोकाही अधिक आहे. 

माणसांना प्रादुर्भाव होतो का?

बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांपासून माणसांपर्यंत पोहोचू शकतो. जगात पहिल्यांदा अशी केस चीनमध्ये आढळली होती. 1997 मध्ये हाँगकाँगमधील एका पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या व्यक्तीला बर्ड फ्लू झाला. तो सतत पक्ष्यांच्या संपर्कात असल्यामुळे हा विषाणू त्याच्यापर्यंत पोहोचला. हा विषाणू अत्यंत घातक आहे. एकदा संसर्ग झाला तर मृत्यूदर 60 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळेच याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.

हेही वाचा:

Watermelon: हे फळ किडनीसाठी अमृतापेक्षा कमी नाही, शरीरातील विषारी घटक काढून टाकते; जाणून घ्या फायदे!