पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत. असं असताना भाविकांची रोजची गर्दी वाढतच चालली असून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनच्या संकेतामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी धास्ती बसली आहे. आता नागरिक आणि व्यापाऱ्यांनाच हाल टाळायचे असतील तर पंढरपूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी काही दिवस बंधनकारक करण्याची मागणी आमदार समाधान अवताडे यांनी केली आहे. 


सध्या काही दिवसापासून रोज पंढरपूरमध्ये सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. यातच सध्या शहरात जवळपास 800 कोरोनाच्या वर रुग्णांवर उपचार सुरु असून काल केलेल्या तपासणीत नवीन 128 रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क बनले आहे.
 
पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ पंढरपुरवर येणार असल्याने आता व्यापारी आक्रमक झाले आहेत. गेल्या 26 महिन्यांपासून आर्थिक चक्र थांबले असताना आता आम्हाला 8 वाजेपर्यंत व्यापार करण्याची मोकळीक देण्याची मागणी ते करत आहेत. कोरोना व्यापाऱ्यांच्यामुळे नाही तर बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचा आरोप व्यापारी सत्यविजय मोहोळकर यांनी केला आहे. बँकांची कर्जे आणि त्याचे व्याज याच्या बोजाखाली व्यापारी दबून गेला असताना आता वीज बिले, नगरपालिका कर याच्या पैशासाठी जोरदार वसुली सुरु आहे. दुकाने बंद असताना कुठून पैसे आणायचा असा सवाल या व्यापाऱ्यांनी केला आहे. 


Coronavirus Cases : सहा दिवसानंतर देशातील रुग्णसंख्या घटली; गेल्या 24 तासात 30 हजार नव्या रुग्णांची भर, 442 जणांचा मृत्यू


दरम्यान कोरोनाचे नियम पाळून विठ्ठल मंदिर उघडण्याची मागणी आता वारकरी संप्रदायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे. गेल्या 26 महिन्यापासून पंढरपूरचे जसे अर्थचक्र मोडून गेले आहे. तसेच विठ्ठल मंदिर बंद असल्याने वारकऱ्यांची मानसिक शक्तीचेही खच्चीकरण होत असल्याने तातडीने मंदिरे उघड असे समस्त वारकरी, फडकरी, दिंडीकरी समाजाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आणि किरण महाराज जाधव यांनी केली आहे. 


सध्या प्रशासन मात्र वाढत कोरोना रोखण्यासाठी तपासण्यांचा वेग वाढवत असून लॉक डाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्याच्या तयारीला लागले आहे. सध्या रोज पंढरपूरमध्ये जवळपास 25 हजारापेक्षा जास्त भाविक येत असल्याने आता कोरोना रोखण्यासाठी आधी या भाविकांवर निर्बंध घालायचे की त्यांची तपासणी करून त्यांना सोडायचे हा निर्णय पहिल्यांदा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. काही असले तरी पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेपूर्वीच पंढरपूरची स्थिती मात्र पुन्हा गंभीर बनू लागली आहे.


महत्वाच्या बातम्या :